हृदयद्रावक! सिमेंटच्या चालू मिक्सरमध्ये पडला तरुण; जागीच मृत्यू

one employee accident in chiplun and he dead in accident
one employee accident in chiplun and he dead in accident

चिपळूण (रत्नागिरी) : सध्या गुहागर-विजापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पेंढाबे येथे मनीषा कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या सिमेंटच्या चालू मिक्‍सरमध्ये पाय घसरून तोल गेल्याने नजबुल हुसेन या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अलोरे शिरगाव पोलिस माफीजुल इस्लाम यांनी फिर्याद दिली आहे.

पेंढाबे येथे मनीषा कंपनीचा सिमेंटचा प्लॅन्ट आहे. याठिकाणी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास माफीजुल इस्लाम व नजबुल हुसेन हे कामगार काम करीत होते. यावेळी सिमेंटचे मिक्‍सर सुरू होते. यावेळी मिक्‍सरमध्ये सिमेंटची घाण अडकली होती. त्यावेळी सुरू असलेल्या मिक्‍सरमधील अडकलेली घाण काढत असताना नजबुल याचा तोल गेला आणि त्यामध्ये पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर शिरगाव पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर कामथे कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कोलकाता येथील मूळगावी पाठविण्यात आला. नजबुल हुसेन हा मूळचा कोलकाता येथील असून वर्षभरापूर्वी मनीषा कंपनीत तो कामाला लागला होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com