कर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून

हेमंत देशमुख 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

कर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

श्याम हातंगले हे कर्जतमधील क्रांतीनगर येथे वास्तव्यास होते. रात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुजाता तनावडे करीत आहेत.

Web Title: One Killed with the help of stones in Karjat