वाशी बाजारात गेले पाच दिवस हापूसच्या दररोज एक लाख पेट्या

वाशी बाजारात गेले पाच दिवस हापूसच्या दररोज एक लाख पेट्या

रत्नागिरी - वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात सोमवारपासून हापूससह अन्य आंब्यांची आवक वाढली आहे. सलग चार ते पाच दिवस कोकणासह अन्य भागातून दररोज सुमारे एक लाख पेटी दाखल झाली आहे. परिणामी हापूसचे दर उतरले आहेत. उष्मा वाढल्यामुळे आंब्याची तोडणी वेगाने सुरु झाली आहे. घाऊक बाजारात पेटीचा दर अडीच हजार रुपयांपर्यंत आला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून अजुनही कर्नाटकी व हापूसमध्ये चलाखी केली जाते. 

यंदा हवामान बदलाचा फटका बसल्याने हापूसचे उत्पादन घटले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक निम्म्यावर आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपासून हवामानात उष्णता वाढत आहे. हापूसला जादा उन्हाचा तडाखा बसत असल्याने कोकणातील बागायतदार आता आंबा तोडणीवर भर देत आहेत. नेहमी बाजारात 40 ते 45 हजार पेटयांची आवक होते, मात्र, सोमवारपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात 80 ते 85 हजार पेटया दाखल झाल्या. मंगळवारी 80 हजार पेटयांची आवक झाली आहे. एपीएमसी बाजारातील आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. 3 हजार रुपयांपर्यंतची पेटी अडीज हजार रुपयांना विकली जात आहे. आवक वाढल्यामुळे व दर्जा खालावल्याने मागणीही कमी आहे. दर्जात्मक व मुबलक हापूस उपलब्ध नसल्यामुळे हंगामावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

वाशी बाजारात हापूसबरोबर कर्नाटकी आंब्याची आवक आहे. हापूसच्या उत्पादनात घट झालीच, बरोबरच दर्जावरही परिणाम झाला आहे. याचा फायदा किरकोळ विक्रेते घेत आहेत. हापूसचे नाव सांगून कर्नाटकी आंबा विकत आहेत. एपीएमसीबाहेर पदपथावर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असल्यामुळे हे किरकोळ विक्रेते इतर लहान विक्रेत्यांना हाताशी धरून, फिरत आंबा विकतात. 

ग्राहकांची फसगत 

हापूसच्या दरांची घसरण सुरु आहे. चांगल्या हापूसला 2 हजार 500 रुपये दर मिळतो. प्रति डझनला 75 ते 300 रुपये आणि चांगला हापूस 350 ते 450 रुपयांना उपलब्ध आहे. बाजारात कर्नाटक आंबा 10 हजार ते 15 हजार क्रेट येत आहेत. प्रति किलोला 60 ते 100 रुपये भाव आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी कमी दरात आंबा खरेदी करून दोन्ही एकत्र करून ग्राहकांच्या माथी मारत असल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. 

नवी मुंबईत किरकोळ विक्रेते येथून हापूस व कर्नाटकी आंबा घेऊन जातात. दोन्ही एकत्र करून हापूसच्या पेटीत भरून हापूस म्हणून विकतात. काही ग्राहक घाऊक बाजारापेक्षा बाहेर हापूस स्वस्तात मिळत असल्याने खरेदी करतात. त्यांच्यावर लक्ष देणारी यंत्रणा नाही. 
- संजय पानसरे,
वाशी मार्केट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com