राष्ट्रवादीचा एक नेता राजकीय खेळीचा शिकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

रत्नागिरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सम्राटांच्या मनमानी आणि एककलमी कार्यक्रमांमुळे पालिका निवडणुकीत पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यात पक्षातील आणखी एक नेता राजकीय खेळीचा शिकार ठरला. त्यांच्या पत्नीचे दोन्ही प्रभागांतील उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा त्याचा समज आहे. त्याबद्दल तो नाराजही आहे. या घडामोडींमुळे नगराध्यक्षपदावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसची पकड आणखी ढिली झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला याचा अप्रत्यक्ष फायदा होणार असून त्यादृष्टीने राजकीय फासे पडत असल्याची चर्चा आहे.

शहरामध्ये शिवसेनेला तोडीस तोड देण्याची धमक फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होती. अल्पावधीतच हा पक्ष मोठा झाला. परंतु राजकीय उलथापालथ होऊन मोठा नेता राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत गेला. तेव्हापासून राष्ट्रवादीला शहरात नव्हे तर जिल्ह्यात उतरती कळा लागली आहे. अजूनही हा पक्ष राजकीय धक्‍क्‍यातून सावरलेला नाही. नवख्यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली. परंतु त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये डावलले गेले. विश्‍वासात न घेता पालिका निवडणुकीतील उमेदवार ठरविण्यात आले. त्यांचा थेट रोष माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्यावर असल्याचे संकेत देत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा दिला. यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष बबलू कोतवडेकर, शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथेच थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश शेट्ये यांना अंतर्गत फटका बसला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी सौ. वहिदा मुर्तुझा यांना प्रभाग 12 (अ) आणि प्रभाग 15 (अ) या दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते. एका ठिकाणी तरी त्यांना उमेदवारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु अर्जामध्ये अशा काही त्रुटी होत्या, की दोन्ही अर्ज बाद झाले. जाणीवपूर्वक आपल्याविरुद्ध ही राजकीय खेळी केल्याचा रोष मुर्तुझा यांच्यामध्ये निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेश शेट्ये यांना ते किती पाठिंबा देतील याचीच चर्चा आज सुरू झाली. मुळातच पक्षातील अनेकांनी राजीनामा दिल्यामुळे शेट्ये यांची पकड ढिली झाली होती. त्यात उमेदवारी अर्जाच्या या नाट्यामुळे अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

Web Title: One leader of NCP targated

टॅग्स