शिवराज्याभिषेकाच्या वेळी दरड कोसळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांपैकी एका शिवप्रेमीच्या अंगावर दरड कोसळून तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

रायगड - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांपैकी एका शिवप्रेमीच्या अंगावर दरड कोसळून तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून पायर्‍यांनी खाली उतरताना महादरवाज्याजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्तांची कोंडी झाली. त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. मृत शिवभक्तांचे नाव अशोक उंबरे असे आहे तर तो रा. ऊळुप ता. भुम जि. उस्मानाबाद येथिल आहे. याशिवाय, या घटनेत ५० हून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत असे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे. तर काही जखमींनी प्राथमिक ऊपचार न घेताच आपल्या गावाचा परतीचा प्रवास सुरू केला.

Web Title: one person dies during Shivrajyabhishek sohala raigadh