जिल्ह्यात एक हजार 476 गावांसाठी आराखडा 

प्रणय पाटील - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 10 जानेवारी 2017

अलिबाग - जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही, या वर्षी पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. पुढील काही दिवसांत एक हजार 476 गावे व वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. 

यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सहा कोटी 25 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. 

पाणीपुरवठा विभागाने सर्व पंचायत समित्यांकडून पाणीटंचाईची शक्‍यता असलेल्या गावांची व संभाव्य उपाययोजनांची माहिती गोळा केली आहे. त्याआधारे जिल्ह्याचा एकत्रित संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. 

या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे सद्यस्थितीत कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा सुरू नाही. धरणांमधील पाणीसाठा खालावत आहे. विंधनविहिरी व विहिरींमधील पाणीसाठाही कमी होत आहे. यामुळे पुढील काही दिवसांत जिल्ह्याला पाणीटंचाईचा झळा बसू लागतील. जूनपर्यंत 367 गावे व एक हजार 109 वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्‍यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. 

Web Title: one thousand 476 villages in the district plan