esakal | रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात केवळ 8 कोरोनाबाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

Only 8 Corona Patient Found In 24 Hours In Ratnagiri District

मास्क न वापरणाऱ्यांवर होणारी सक्तीची कारवाई आणि जनजागृतीमुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाला रोख बसला आहे. आज फक्त 8 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8 हजार 383 झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात केवळ 8 कोरोनाबाधित 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा जोर ओसरत चालल्याचे आजच्या आकड्याने स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासांत तीन महिन्यांतील सर्वांत नीचांकी म्हणजे केवळ 8 कोरोना बाधित सापडले आहेत, तर 85 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक दिवसात 8 जणांनी कोरोनावर मात केली असून, जिल्ह्यात एकाचाही आज मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना या चाचण्यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. 

मास्क न वापरणाऱ्यांवर होणारी सक्तीची कारवाई आणि जनजागृतीमुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाला रोख बसला आहे. आज फक्त 8 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8 हजार 383 झाली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 5 तर अँटिजेन चाचणीत 3 जण पॉझिटिव्ह मिळाले. सर्वांत जास्त 5 रुग्ण रत्नागिरीत, तर 2 गुहागर, 1 चिपळूण येथील आहे. मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्‍वर, लांजा, राजापूर तालुक्‍यात एकही बाधित सापडलेला नाही. 

जिल्ह्यात दिवसभरात 8 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 7 हजार 742 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 92.35 टक्के झाले आहे. जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही, तरी मृत्यूदर 3.73 टक्‍क्‍यांवर स्थिर आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांपैकी 238 जणं विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

* एकूण बाधित 8,383 
* एकूण निगेटिव्ह 47,357 
* एकूण बरे झालेले 7,742 
* मृत पावलेले 313 
* उपचाराखालील 238 
 

loading image
go to top