लहानग्यांच्या इच्छाशक्तीला मिळाले मोकळे अाकाश

अमित गवळे
बुधवार, 9 मे 2018

पाली (रायगड) : रायगड जिल्हयात पहिल्यांदाच उन्हाळी शिबिर राबविले गेले. त्या अंतर्गत "मला काय व्हायचयं"? या विशेष उपक्रमात सर्वच राजिप शाळांतील विद्यार्थी न घाबरता अभिव्यक्त झाले. विद्यार्थ्यांनी शाळेत अालेल्या विषेश पाहुण्यांना देखिल विवीध प्रश्न विचारुन अापल्या जिज्ञासा व कुतूहलाचे समाधान मिळविले.

पाली (रायगड) : रायगड जिल्हयात पहिल्यांदाच उन्हाळी शिबिर राबविले गेले. त्या अंतर्गत "मला काय व्हायचयं"? या विशेष उपक्रमात सर्वच राजिप शाळांतील विद्यार्थी न घाबरता अभिव्यक्त झाले. विद्यार्थ्यांनी शाळेत अालेल्या विषेश पाहुण्यांना देखिल विवीध प्रश्न विचारुन अापल्या जिज्ञासा व कुतूहलाचे समाधान मिळविले.

सुधागड तालुक्यातील रा जि प डिजिटल शाळा धोंडसे येथे सेवा निवृत्त पोलीस सहाय्यक उप. निरीक्षक बबन गोविंद कांबळे व सेवा निवृत्त शिक्षिका किरण प्रकाश तायडे यांनी या उपक्रमा अंतर्गत भेट दिली. त्यांनी दररोज व्यायाम, योगा, व्यक्तिमत्व विकास, करियर मार्गदर्शन, आरोग्यदायी सवयी, निटनेटके राहणे, अभ्यासाचे महत्व, प्राणी मात्रांवर दया करणे अादी बाबींवर चर्चा केली. दोन्ही मान्यवरांनी आपल्या जिवनातील प्रसंग सांगितले, आपआपल्या खात्याविषयी माहीती दिली.

मुलांना प्रश्न विचारला "तुम्हाला काय व्हायचे अाहे?" तेव्हा कोणी पोलीस, सैनिक, डॉक्टर, शेतकरी असे विविध उत्तरे दिली. सर्व मुलांनी देखील पाहुण्यांना प्रश्न विचारले - तुमची भरती कशी झाली?, तुमचा ड्रेसचा रंग असा का आहे.?, तुमच्या कामाचे स्वरुप काय आहे?, आमची शाळा बघून तुम्हाला काय वाटते?, मला शिक्षक व्हायचे मला काय करावे लागेल? एखाद्या दंगलीत तुम्ही सहभागी झाले होते का? लहनपणी कुठे शिकलात? अभ्यास नाही केला हे तुम्हाला कसे कळते? असे विविध प्रश्न विचारले. दोन्ही मान्यवरांनी मुलांचे खुप कौतुक केले. शाळा पाहून समाध व्यक्त केले. हा कार्यक्रम अभय यावलकर, मुख्यकार्यकारी आधिकारी,अलिबाग यांच्या संकल्पनेतुन साकारला अाहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अनिल कुलकर्णी गटशिक्षण अधिकारी, पाली यांनी केले. केद्रप्रमुख प्रकाश तायड़े यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. सह शिक्षीका सिमा सिरसट यांचे उत्तम सहकार्य लाभले.

"मला काय व्हायचयं" या विशेष उपक्रमासाठी शाळेच्यावतीने डॉ. नंदकुमार मुळे (शालेय आरोग्य तपासणी पथक प्रमुख,सुधागड) यांना अामंत्रित करण्यात आले होते.विद्यार्थ्यानी अनौपचारिक प्रश्न विचारुन त्यांची मुलाखत घेतली. डॉक्टरांनी देखिल मुलांच्या प्रश्नांची मनसोक्त व दिलखुलास उत्तरे दिली. तद्नंतर डॉक्टरांनी सर्व जमलेल्या आजी-माजी विद्यार्थ्याशी संवाद साधत व्यक्तिमत्व विकास,करियर मार्गदर्शन, आरोग्यदायी सवयी याची माहिती देवून"कोणतेही क्षेत्र निवडा पण जे कराल ते सर्वात्तम करा" असे बहुमल्य मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता कडाळी व शिक्षक कुणाल पवार उपस्थीत होते.

"या उपक्रमामुळे मुलांची पोलिसां विषयी भिती गेली,शिक्षणाची आवड निर्माण झाली, विदयार्थी स्वतः चिकित्सक प्रश्न तयार करतात. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला व मला काहीतरी व्हायचे हे मुलांना समजले"

- दिलीप गावीत, मुख्याध्यापक, रा.जि.प डिजिटल शाळा,धोंडसे

Web Title: open platform for children