कळकवणेत शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

चिपळूण - तालुक्‍यातील कळकवणे येथील वृद्धाचे नुकतेच निधन झाले. गावातील शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गावातील काहींनी विरोध केला. परिणामी भर  पावसात नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिपळूण - तालुक्‍यातील कळकवणे येथील वृद्धाचे नुकतेच निधन झाले. गावातील शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गावातील काहींनी विरोध केला. परिणामी भर  पावसात नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, नदीला पूर आल्याने अस्थी पाण्यात वाहून गेल्या. अंत्यसंस्कारास विरोध केल्याबद्दल रोहिदास समाजबांधवाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

कळकवणे येथील चर्मकार समाजातील तानू लक्ष्मण मेटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार गावातील शासकीय स्मशानभूमीत करण्यासाठीची तयारी करण्यापूर्वी गावप्रमुखांना उपस्थित समाजबांधवांकडून विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी असहमती दर्शवून विरोध केला. परिणामी सजाबांधवांना नाईलाजाने भर पावसात नदीकाठी अंत्यविधी करावा लागला. पावसाच्या जोरामुळे नदीला आलेल्या पुरात अस्थी पाण्यात वाहून गेल्या. स्वातंत्र्योत्तर काळात अशा प्रकारची घटना निंदनीय व संतापजनक आहे. 

समाजाने पालकत्वाची भूमिका अशा प्रसंगात घेतली पाहिजे. ही घटना निषेधार्ह आहे. मृत व्यक्तीचे नातू दिलीप मेटेकर यांचे गावात घर आहे. त्यांच्या घराकडे येण्यासाठी अनेक वर्षे मागणी करूनही पायवाट नाही. त्याचबरोबर घराजवळ असलेल्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास देखील मनाई आहे. त्यामुळे दुरवरुन बौद्धवस्तीतून पाणी आणावे लागते.

ग्रामदेवतेची पालखी गावात सर्वत्र जाते. परंतु या कुटुंबाचे घरी पालखी आणली जाते. वर्गणी स्वीकारली जात नाही. मूलभूत सोईसुविधापासून वंचित ठेवले जात आहे.

सर्व समाजामध्ये सलोखा व सामंजस्य राहावे अशी रोहिदास समाजाची प्रामाणिक भूमिका आहे. जातीयता पाहून मागास समाजावर अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही.
- सुरेशशेठ चिपळूणकर,
अध्यक्ष, रोहिदास समाज सेवा संघ

Web Title: oppose to Funeral in Government Graveyard

टॅग्स