चार वर्षापासुन धनश्री जोशी सेंद्रीय शेतीतून मिळवतात हळदीचे उत्पन्न ; यंदाची लागवड सात गुंठ्यांत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता केवळ गांडूळ खताचा वापर करून उत्पन्न घेण्याचा प्रयोग

साखरपा (रत्नागिरी) : कोकणात हळद लागवड पीक वाढीला लागत असताना कोंडगावात हे पीक केवळ गांडूळ खतावर घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धनश्री जोशी यांनी आपल्या सात गुंठ्यांत हा प्रयोग केला आहे. कोकणात हळद लागवड नवीन नाही. पण या पिकावर कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता केवळ गांडूळ खताचा वापर करून उत्पन्न घेण्याचा प्रयोग कोंडगाव येथील धनश्री जोशी यांनी केला आहे. 

हेही वाचा - त्सुनामीचा संदेश आला अन् गावकऱ्यांचा एकच गोंधळ उडाला -

शेतात काही भागावर सरी पद्धतीने तर काही भागात गादीवाफे करून त्यांनी ही लागवड केली आहे. सेलम जातीच्या 30 किलो बियाण्यांचा वापर जोशी यांनी केला आहे. या पिकासाठी वापरण्यात वापरण्यात आलेले गांडूळ खतही धनश्री जोशी यांनी स्वत: शेतातील पालापाचोळा वापरून घरच्याघरी तयार केले आहे. शेत नांगरणीसाठी जोशी यांनी पारंपरिक बैल जोटांचा वापर न करता ट्रॅक्‍टरचा वापर केला तसेच आतापर्यंत दोनवेळा शेतातून खुरपणी केली आहे. 

गेली चार वर्षे जोशी अशा प्रकारे हळद लागवड करत असून, यंदा त्यांना किमान 100 किलो हळद मिळण्याची अपेक्षा आहे. धनश्री जोशी यांच्या या प्रयत्नाला घरातून मोठी साथ मिळाली. घरातील सर्व कुटुंबीयांनी या लागवडीसाठी प्रथमपासून शेतात कष्ट केल्याचे त्या सांगतात. बाहेरील एकही मजूर न करता संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीने हे पीक घेतल्याचे त्या सांगतात. 

हेही वाचा -  कोकणात अळंबी उत्पादन ठरु शकते भातशेतीला जोडव्यवसाय - 

"हळद हे पीक कोकणात हमखास समजले जाते पण सेंद्रिय खतावर केलेली हळद ही उत्तम प्रतीची तर असतेच पण बाजारात तिला दरही जास्त मिळतो."

- धनश्री जोशी  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: organic fertilizer use dhanashri joshi for turmeric crop in konkan ratnagiri this year 100 kilo turmeric expect