रत्नागिरी : कोअर बॅंकिंगसाठी स्वतःचे सॉफ्टवेअर

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष निवडीनंतर डॉ. चोरगे यांची घोषणा
रत्नागिरी : कोअर बॅंकिंगसाठी स्वतःचे सॉफ्टवेअर
रत्नागिरी : कोअर बॅंकिंगसाठी स्वतःचे सॉफ्टवेअर sakal

रत्नागिरी : विविध कार्यकारी सोसायट्या या बँकेचा पाया आहेत. त्या सक्षम करण्यावर भर देणार आहे. त्यासाठी सर्व सोसायटींचे संगणकीकरण केले जाईल. तीन नवीन मोबाईल एटीएम व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. पंधरा कोटी रुपये खर्च करून जिल्हा बँक कोअर बँकिंगचे स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित करणार आहे, अशी घोषणा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेत डॉ. चोरगे बोलत होते. दरम्यान, निवडून आल्यानंतर डॉ. चोरगे यांनी भविष्यात बँकेचा कारभार जास्तीत जास्त चांगला चालवण्यासाठी पावले उचलण्याचे आश्‍वासन दिले.

चोरगे म्हणाले, ‘‘बँकेने गेल्या पंधरा वर्षांत संपूर्ण भारतामध्ये चांगले काम केले असून, नाबार्ड, आरबीआयनेही कौतुक केले. दहा वर्षे शून्य एनपीए असून, ग्रॉस एनपीए १.२७ आहे. त्यामुळे सभासदांना पंधरा टक्के लाभांश दिला जातो.’’

रत्नागिरी : कोअर बॅंकिंगसाठी स्वतःचे सॉफ्टवेअर
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

जिल्ह्यातील ३७२ प्राथमिक सहकारी विविध कार्यकारी सोसायटींचे संगणकीकरण करण्याचा ठराव सात दिवसांनी होणाऱ्‍या बँक संचालकांच्या बैठकीत केला जाईल. कोअर बँकिंगसाठीचे सीबीएस सॉफ्टवेअरसाठी लागणाऱ्या १५ कोटीपैकी सहा कोटीची तरतूद झाली आहे. लवकरच उर्वरित तरतूदही केली जाईल. जिल्ह्यातील अनिष्ठ तफावतीमुळे बंद ९ सोसायट्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी ३७ लाखांची तरतूद करणार. तसेच त्यांचे विविध फंडही वाढवले जातील.

पूरपरिस्थितीत चिपळुणात एटीएम मोबाईल व्हॅनचा वापर नागरिकांना फायदेशीर ठरला. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील तीन विभागांसाठी प्रत्येकी एक मोबाईल एटीएम व्हॅन खरेदी करण्यात येणार आहे. चिपळुणातील पूरग्रस्तांसाठी पाच टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय झाला होता. त्यामधून १५ व्यापाऱ्‍यांना ८० लाखांचे कर्ज वितरित केले. या व्यतिरिक्त खेड, दापोली, राजापूर, संगमेश्‍वर येथील पूरग्रस्त शेतकऱ्‍यांनाही कर्ज वाटप करण्यात आले, असे चोरगेंनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, सुधीर कालेकर, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, संजय रेडीज यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

डॉ. चोरगे म्हणाले..

  • पंधरा वर्षात भारतामध्ये बँकेचे चांगले काम

  • नाबार्ड, आरबीआयनेही केले कौतुक

  • दहा वर्षे शून्य एनपीए; ग्रॉस एनपीए १.२७

  • सभासदांना दिला जातो पंधरा टक्के लाभांश

  • कोअर बँकिंग सॉफ्टवेअरसाठी सहा कोटीची तरतूद

  • तीन विभागांना प्रत्येकी एक मोबाईल एटीएम व्हॅन असेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com