पाबळ येथील विज्ञान आश्रमातून गांधीजींची नई तालीम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - पुण्याजवळच्या पाबळ येथील विज्ञान आश्रम महात्मा गांधीजींनी सांगितलेली नई तालीम प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करत आहे. बुद्धीने काम केल्यास हाताला काम मिळते, याचा अनुभव येथील विद्यार्थी घेत आहेत, असे प्रतिपादन या आश्रमाचे उपसंचालक रणजित शानबाग यांनी केले. 

रत्नागिरी - पुण्याजवळच्या पाबळ येथील विज्ञान आश्रम महात्मा गांधीजींनी सांगितलेली नई तालीम प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करत आहे. बुद्धीने काम केल्यास हाताला काम मिळते, याचा अनुभव येथील विद्यार्थी घेत आहेत, असे प्रतिपादन या आश्रमाचे उपसंचालक रणजित शानबाग यांनी केले. 

भारत शिक्षण मंडळाच्या गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन सेवाव्रती पुरस्कार शिक्षणाची प्रयोगशाळा असलेल्या विज्ञान आश्रम संस्थेला प्रदान केला. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. पुरस्काराचे स्वरूप रोख 25 हजार रुपये, सन्मानपत्र असे होते. ठाकूर सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन यांनी सांगितले की, अच्युतरावांची स्मृती मनात जतन व्हावी, यासाठी दोन वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे.

शाळेचा इतिहास गौरवशाली आहे. संस्थापक केशवराव हे माझे आजोबा व वडिल शंकरराव यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. मी शाळेचा माजी विद्यार्थी असून निवृत्तीनंतर 2003 पासून त्यांचा वारसा जपतोय. बालवाडी ते वरिष्ठ महाविद्यालयात 3600हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. गुरुवर्य शंकरराव पटवर्धन आदर्श शिक्षक पुरस्कार पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद कदम यांना देण्यात आला.

केशवराव पटवर्धन आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार भूषण गवाणकर यांना तसेच युनायटेड उद्योग समूहाचा पुरस्कार राजेंद्र कांबळे यांना देण्यात आला. कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, बियाणी बालमंदिरच्या शिक्षिका अपर्णा गोगटे, बालवाडी सेविका वैष्णवी पावसकर यांनाही पुरस्कार देण्यात आला. विनय परांजपे व उदय बोडस यांनी निवेदन केले. 

दुसऱ्याच वर्षी सुवर्णपदक 
मुंबई विद्यापीठाशी संलग्न 800 महाविद्यालयांतून युवा महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या सिद्धी नार्वेकर हिने मराठी वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. वादविवादमध्ये सुप्रिया देसाई, कौस्तुभ फाटक यांना रौप्य मिळाले. देणगीदार डॉ. सुभाष देव व डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pabal VIGYAN AASHRAM Deputy director Ranajeet Shanbhag comment