पाचल ग्रामपंचायतीत स्वच्छता अभियानासाठी फेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पाचल - राजापूर तालुक्‍यातील पाचल ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत पाचल बाजारपेठेत संपर्क फेरी काढण्यात आली. याच्या यशस्वीतेसाठी वाडीवार निवडलेल्या कमिटीमार्फत प्रथम सर्व्हेक्षण व मार्गदर्शन फेरी त्यानंतर एक महिन्याने पर्यवेक्षण व मूल्यमापनासाठी दुसऱ्या फेरीचे आज आयोजन झाले. गावांमध्ये प्रदूषण करण्यात जास्त वाटा असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या पाचलमधून हद्दपार करण्याची मोहीम पाचल ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे.

पाचल - राजापूर तालुक्‍यातील पाचल ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत पाचल बाजारपेठेत संपर्क फेरी काढण्यात आली. याच्या यशस्वीतेसाठी वाडीवार निवडलेल्या कमिटीमार्फत प्रथम सर्व्हेक्षण व मार्गदर्शन फेरी त्यानंतर एक महिन्याने पर्यवेक्षण व मूल्यमापनासाठी दुसऱ्या फेरीचे आज आयोजन झाले. गावांमध्ये प्रदूषण करण्यात जास्त वाटा असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या पाचलमधून हद्दपार करण्याची मोहीम पाचल ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. दुकानातूनच प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये प्लास्टिक मुक्त होण्यासाठी जागृती करण्यासाठी दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी सरपंच सौ. अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. कल्पना सक्रे, सुशांत वायकूळ, सौ. उमा शंकर पाथरे, ग्रामविकास अधिकारी संदीप हांदे, ग्रामपंचायत शिपाई रघुनाथ आजविलकर उपस्थित होते.

Web Title: Pachal Grampanchayat Swatcha Abhiyan