पडेल-जामसंडे मार्गावर लस घेण्यासाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला

कोविडची लस घेण्यासाठी जोशी दांपत्य येथील ग्रामीण रुग्णालयात येत असताना अपघात
Accident
Accident

देवगड (सिंधुदुर्ग) : छोटा टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या धडकेत तालुक्‍यातील नाडण जोशीवाडी येथील दाम्पत्याचा आज मृत्यू झाला. संजय दत्तात्रय जोशी (वय ५०) आणि सौ. सायली (४४) अशी त्यांची नावे आहेत. अपघात काल दुपारी पावणेचारच्या सुमारास पडेल-जामसंडे मार्गावर वाडा सडेवाडी भागात झाला. कोविडची लस घेण्यासाठी जोशी दांपत्य येथील ग्रामीण रुग्णालयात येत असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी

संजय जोशी पत्नीसह दुचाकीवरून नाडण येथून देवगडच्या दिशेने येत होते. वाडा-सडेवाडी भागातील सरळ रस्त्यावर आल्यानंतर पडेलच्या दिशेने जाणाऱ्या छोटा टेंपो आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. अपघातामध्ये संजय जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. सायली गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर सायली यांना येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले.त्यानंतर त्यांना कणकवली येथे हलवताना वाटेतच त्यांचे निधन झाले.

हेही वाचा- धक्कादायक! विनाकारण फिरणाऱ्या १४५ पैकी पाच पॉझिटिव्ह

अपघाताची माहिती मिळताच येथील सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, सहायक उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार फकरुद्दीन आगा, काँस्टेबल गणेश चव्हाण, प्रवीण त्रिंबके आदींनी घटनास्थळी भेट दिली. जोशी यांच्या नातेवाइकांसह वाडा, नाडण परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com