राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही - पद्माकर आरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Padmakar Arekar statement ncp party leader Not upset not getting required support office bearers will resign guhaghar

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही - पद्माकर आरेकर

गुहागर : राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. सामूहिक राजीनामे असा कोणताही विषय नसून पक्ष कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तिगत स्टेटमेंट केले असेल तर तालुका राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी दिली. मध्यंतरी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत नसल्याने काही पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार, असे वृत्त प्रसारित झाले होते.

या वृत्तानंतर गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सामूहिक राजीनामे अशी बातमी पसरवणारी व्यक्ती कोण, याचीही चर्चा झाली. काही कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेण्यात आली. तेव्हा असा कोणताही विषय नसल्याचे समोर आले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पद्माकर आरेकर म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत. गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संघटनावाढीसाठी काम करत आहेत. अंजनवेल, पालशेत, तवसाळ व वेळणेशवर या चार गटात आढावा बैठका झाल्या आहेत.

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात खासदार सुनील तटकरे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. व पं. स निवडणुका लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. या निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळेल, असा ठाम विश्वास आहे. बैठकीला राजेश बेंडल (नगराध्यक्ष, गुहागर नगरपंचायत), प्रदीप बेंडल, विजय मोहिते, रामचंद्र हुमणे, लतिफ लालू, अजित बेलवलकर, गौरव वेल्हाळ, वैभव आदवडे उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ते स्टेटमेंट

सामूहिक राजीनामे असा कोणताही विषय नसून पक्ष कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तीगत पातळीवर स्टेटमेंट केले असेल तर त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम आहेत, असेही श्री. आरेकर यांनी नमुद केले.

टॅग्स :KokanNCPresignation