आमले घाटात पावसाने खचला रस्ता अन् बस सेवाही!

भगवान खैरनार
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

आमले घाटात 20 सप्टेंबरला अतिवृष्टीने रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. दिवाळी सणाला घरी जाण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी चाकरमाणी व नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आणि खिशाला झळही सोसावी लागली आहे.

मोखाडा : पालघर - वाडा - देवगाव रस्त्यावरील वाडा - खोडाळा दरम्यान आमले घाटात 20  सप्टेंबरला मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आहे. तेव्हापासून या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम दीड महिना होऊनही न झाल्याने शालेय, महाविध्यालयीन विध्याथीॅ आणि कार्यालयीन कामकाज व बाजारहाट करण्यासाठी जाणार्‍या आदिवासींना बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. बांधकाम खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे विध्याथीॅ व नागरिकांची फरफट गेली दिड महिण्यांपासुन सुरू आहे. 

आमले घाटात 20 सप्टेंबर ला अतिवृष्टीने रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. दिवाळी सणाला घरी जाण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी चाकरमाणी व नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आणि खिशाला झळही सोसावी लागली आहे. या मार्गावरून शिर्डी, नासिक, त्र्यंबकेश्वर, नंदुरबार, औरंगाबाद, ठाणे या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी बससेवा आहेत. तर शालेय  व महाविध्यालयीन विद्यार्थ्यांना खोडाळा विज वाडा येथे जाण्यासाठी बससेवा बंद असल्याने, खाजगी आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागला आहे. दाटीवाटीत, गाडीच्या छप्परावर जिव धोक्यात घालून विध्याथीॅ व नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजासाठी चाकरमानी व बाजारहाट करण्यासाठी आदिवासींना अशाच पध्दतीने जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. खचलेल्या रस्त्याचे काम  4  ते 5 दिवसात पुर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम, मोखाडा ऊपविभागाचे , ऊपअभियंता शैलेश शिंदे यांनी दिले होते. मात्र, दिड महिना ऊलटुनही सदरचे काम पूर्ण झालेले नाही. सदरचे काम पूर्ण होण्यास अजून ही 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बांधकाम खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे विध्याथीॅ , नागरिक व चाकरमाण्यांची फरफट होत आहे. विध्याथीॅ, नागरिक व चाकरमाण्यांच्या या धोकादायक प्रवासा दरम्यान, काही अघटित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी बांधकाम खात्याची राहील , असा गर्भित इशारा नागरिकांनी बांधकाम खात्याला दिला आहे. तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदनाव्दारे कळविले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: palghar marathi news heavy rain disrupts road