पालघरची पोट निवडणूक २८ मे रोजी

नीरज राऊत
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पालघर: अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेली पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणूक २८ मे रोजी जाहीर झाली आहे.

३० जानेवारी रोजी २२- पालघर- (अनुसूचित जमाती) राखीव मतदार संघाचे खासदार ऍड्. चिंतामण वनगा यांचे अकस्मात निधन झाले. या जागेकरिता पोट निवडणूक आता २८ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीबरोबर महाराष्ट्रातील ११-भंडारा-गोदिंया आणि नागालँड तसेच उत्तरप्रदेश मधील कैराना मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे.

पोट निवडणुकीसंबंधी अधिसूचना ३ मे रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मे रोजी आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख १४ मे रोजी असून निवडणूक निकाल ३१ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपी एटी अर्थात स्थापीत कागद रेकॉड पद्धती वापरली जाणार आहे.

Web Title: Palghar by the May 28 election