मासवण (पालघर): पुलावरून नदीत पडून तरूण बेपत्ता  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

नातेवाईक व मित्र मंडळी त्याचा कसून तपास करीत आहेत. मात्र  अजूनही तपास लागला नाही. सदर घटनेची तक्रार मनोर पोलीस ठाण्यात तक्रार  केलेली असून पालघर फायर ब्रिगेडला सुद्धा कळविण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत शासनाकडून वा पोलीसांकडून कुठल्याही प्रकारचे शोध कार्य चालू करण्यात आलेले नाही

सफाळे - पालघर तालुक्यातील वसरे येथील सुभाष जगन घरत  (वय 38)  मासवण येथील सूर्या नदीच्या  जुन्या पुलावर मोटरसायकलवरुन् जात असताना अपघात होऊन पाण्याच्या प्रवाहात  वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना गेल्या बुधवारी रात्री घडली 

घरत हे वसई-विरार भागात पाणीपुरवठा करणारया मासवण येथील सूर्या नदीच्या पुलाजवळ सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम करित होते. बुधवारी रात्री साडे आठच्या दरम्यान मासवण येथील जुन्या पुलावरून स्कूटर वरून घरी परतत असताना पुलावर असलेल्या खडयात स्कूटर आदळून तो नदीच्या पात्रात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्कूटर सुरू अवस्थेतच पुलावर सापडली असून त्यांचे  नातेवाईक व मित्र मंडळी त्याचा कसून तपास करीत आहेत. मात्र  अजूनही तपास लागला नाही. सदर घटनेची तक्रार मनोर पोलीस ठाण्यात तक्रार  केलेली असून पालघर फायर ब्रिगेडला सुद्धा कळविण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत शासनाकडून वा पोलीसांकडून कुठल्याही प्रकारचे शोध कार्य चालू करण्यात आलेले नाही. सदर घटनेची तक्रार जिल्हा आपत्ती विभागाकडे सुद्धा करण्यात आली आहे तरी देखील शोध कार्यात कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.

त्यामुळे घरत कुटुंबावर कोसळल्या या डोंगराएवढ्या दुःखात ते पूर्णपणे एकटे पडले आहेत.             

Web Title: palghar news; youth missing