पाली - अतिक्रमणावर कारवाई न केल्याने कार्यकर्ते आक्रमक

अमित गवळे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पाली - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह  स्मारकाच्या आवारातील अतिक्रमण बुधवारी (ता.9) कार्यकर्त्यांनी हटविले.

या अतिक्रमाणाविरोधात पाली ग्रामपंचायत प्रशासनाकडे आंबेडकरी समाजाने सातत्याने पत्रव्यवहार करुन अतिक्रमण हटविण्याबाबतची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून संतप्त आंबेडकरी जनतेने एका घराचे वाढीव बांधकाम तोडले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकालगत अनधिकृत बांधकाम कराल तर याद राखा असे खडसविण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाली येथील आवारालगत भागवतप्रसाद गुप्ता हे वास्तव करीत आहेत. आंबेडकरी समाजाने स्मारकाची स्वच्छता व निगा राखली जावी या उद्देशाने त्यांना राहण्यापुरती जागा दिली होती. मात्र कालांतराने गुप्ता यांनी राहत्या घराचा विस्तार व बांधकाम अनधिकृतरित्या वाढविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी उपस्थीत महिला व कार्यकर्त्यांनी केला. अनेकदा याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रारी अर्ज करुनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सदरचे बांधकाम तोडून टाकले.

Web Title: Pali - Activists aggressive by not taking action on encroachment