राष्ट्रवादीचे पाली उपशहराध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांचा राजीनामा

अमित गवळे
शुक्रवार, 25 मे 2018

पाली (रायगड) : पाली राष्ट्रवादी उपशहराध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी अापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी (ता.24) त्यांनी पाली शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीकडे अापला राजीनामा सपुर्द केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना अापल्या कामाची पद्धत न अावडल्याने त्यांच्या त्रासामुळे पक्ष सोडत असल्याचे त्यांनी अापल्या राजीनामा पत्रात सांगितले आहे.

अनुपम कुलकर्णी यांनी अापल्या राजीनामा पत्रात म्हणले अाहे की, पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करुनही पक्षातील काही जेष्ठ नेत्यांना बहुदा अापल्या कामाची पद्धत न अावडल्यामुळे माझ्या विरुद्ध २२ मे रोजी बैठक लावण्यात आली होती. या बैठकिमुळे अापणास प्रचंड मानसिक त्रास झाला. त्यामुळे खोटे अारोप माझ्यावर लावून पक्षातून माझी हाकलपट्टी होण्यापेक्षा अापणहून पदाचा राजिनामा देत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षतेखाली व वसंत ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाली शहरात पक्ष वाढीसाठी प्रामाणीक व अखंडपणे काम केले आहे. तरीसुद्ध माझ्या विरुद्ध काही पक्षातील काही जेष्ठ नेत्यांकडून षडयंत्र गेल्याने पदाचा राजिनामा देत आहे.
- अनुपम कुलकर्णी

Web Title: pali city vice president of rashtravadi resigns