दलदलीत रुतलेल्या गाईला मिळाले जीवनदान

अमित गवळे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पाली (रोयगड)- येथील बौद्धवाड्या नजीक असलेल्या नाल्यातील दलदलीत सोमवारी (ता.10) एक गाय उलटी पडून रुतली होती. येथे जवळच राहणारे फॉरेस्टर रविंद्र नागोठकर यांनी परिसरातील लोकांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न करून गाईला दलदलीतून बाहेर काढले व तिचे प्राण वाचविले.

ही गाय सकाळी अकराच्या दरम्यान नाल्यात पडली असावी. मात्र कोणालाही या संदर्भात माहिती नव्हते. दलदलीतून बाहेर पडण्यासाठी गाय खूप अटापीटा करत होती मात्र त्यामुळे ती अधिकच रुतत होती. बाजूला राहणाऱ्या एका लहान मुलाला खेळत असतांना ही गाय दिसली. त्याने धावत येऊन ही गोष्ट रविंद्र नागोठकर यांची मुलगी प्रणाली हिला सांगितली. तिने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला. ही गोष्ट समजल्यावर फॉरेस्टर रविंद्र नागोठकर ताबडतोब तेथे गेले आणि त्यांनी गाईला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

यावेळी परिसरात राहणारे किरण पालकर, अभिजीत मोरे, कोकणुज मेस्त्री, गायकवाड आदी मंडळी देखील त्यांच्या मदतीला आले. आणि मग सगळ्यांनी मिळून अथक मेहनतीने गाईला दोरीच्या सहाय्याने दलदलीतून बाहेर काढले. त्यानंतर नागोठकर यांनी गाईला पाणी व चारा खाऊ घातला. आणि दर तासांनी ते या गाईची आपुलकीने पाहणी करून तीच्या तब्बेतीची काळजी घेत होते. जर वेळीच या गाईला दलदलीतुन बाहेर काढले नसते तर कदाचित तिचा मृत्यु झाला असता.
 
Web Title: pali cow got the lifeline

टॅग्स