पाली - अंगारकी चतुर्थीला बाप्पाचा आशीर्वादासाठी गर्दी

pali
pali

पाली - (वार्ताहर) सरत्या वर्षाच्या शेवटच्या अंगारकी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी  (ता.25) पालीत भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मंगळवारी नाताळची सुट्टी असल्याने आदल्या दिवसापासूनच हजारो भाविक पालीत दाखल झाले होते. 

पहाटे पासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही भाविक दर्शनासाठी दूरवरून पायी चालत आले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 35 हजारहून अधिक भाविकांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. हा आकडा संध्याकाळ पर्यंत 80 हजारांच्यावर जाण्याची शक्यता मंदिर विश्वस्थांनी वर्तविली. 

गाभारा, मंदिर सभागृह आकर्षक फुलांनी सजविले होते. बल्लाळेश्वराची मूर्ती देखील मनमोहक सजविण्यात आली होती.  भाविकांच्या गाड्यांमूळे पालीत वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच मंदिराच्या समोरून असलेली मुख्य रस्त्यावरील वाहतूक भक्तनिवासच्या बाजूने वळविण्यात आली होती. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीन चोख व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते.परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदिंचा धंदा तेजित होता. 

बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. 
- ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com