'पाली नगरपंचायत झालीच पाहिजे'

pali
pali

पाली : निवडणुक आयोगाने पाली ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर केला अाहे. त्यामुळेपालीकरांचे नगरपंचायतीचे स्वप्न भंग झाले आहे. पाली ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीयेला मात्र पालीतील जनतेसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे सर्वानूमते ठरले असुन गुरुवारी (ता.३) या संदर्भात पाली तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात ७ ते १२ मे रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दिली अाहे. अाणि २७ मे रोजी मतदान प्रक्रीया होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पाली गावाच्या उज्वल भवितव्यासाठी व पालीच्या सर्वांगिण विकासासाठी पालीकर जनतेसह सर्वपक्षीयांनी पाली नगरपंचायत व्हावी असे वाटत अाहे. त्यामुळे पाली ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या निवडणुक प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचे पालीत सोमवारी (ता.३०) सायंकाळी झालेल्या सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते व पालीकर नागरीक यांच्या बैठकीत ठरले. पाली नगरपंचायत झालीच पाहिजे या मागणीकरीता गुरुवारी (ता.३) सकाळी 11 वाजता सर्वपक्षीयांच्या वतीने पाली तहसिलकार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच पाली नगरपंचायत होण्याबाबतच्या मागणीचे निवेदन पाली तहसिलदार बि.एन.निंबाळकर यांना देण्याचे या बैठकीत ठरले.

यावेळी बोलताना शे.का.प नेते सुरेश खैरे यांनी पाली नगरपंचायत व्हावी या भुमिकेला पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शवून नगरपंचायत होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय बाबींच्या पुर्ततेसाठी शे.का.पक्ष महत्वपुर्ण पुढाकार घेणार असून याकामी सर्वोतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.तसेच शासन दरबारी ही बाब निदर्शनास आणून देण्याकरीता आगामी काळात होणार्‍या पालीच्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. यास शे.का.पक्षाचा पुर्णपणे पाठिंबा राहणार असल्याचे खैरे म्हणाले. तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची भुमिका मांडताना माजी जिप सदस्या गिता पालरेचा यांनी सांगितले कीसद्यस्थितीत पाली ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रीया होणार असताना देखील सर्वपक्षियांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता पुढील काळात निघणारे मोर्चे, तसेच न्यायालयीन प्रक्रीयेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची भुमिका सकारात्मक असेल.भा.ज.प च्या वतीने भुमिका स्पष्ट करताना सुधागड तालुका भा.ज.पा अध्यक्ष राजेश मपारा यांनी सांगितले की पाली गावाच्या विकासासाठी पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मागील वर्षभरापासून पालीकर जनता देखील प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. पाली नगरपंचायत होणे कामी न्यायालयीन प्रक्रीयेत देखील भा.ज.पची भुमिका सकारात्मक असेल. पाली नगरपंचायतीबाबत कॉग्रेसच्या वतीने भुमिका मांडताना सुधागड तालुका कॉग्रेस अध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी म्हणाले की पालीकर जनतेला ग्रामपंचायत नको तर, नगरपंचायत हवी आहे. पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त व्हावा याकरीता प्रशासकीय, न्यायिक व जनआंदोलन या तीन प्रक्रीयेत सर्वपक्षिय कमिटी काम करणार आहे. सर्व प्रथमता न्यायालयात जावून ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीयेला स्थगित घेण्याचे काम केले जाईल. वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन देखील करण्याची आमची तयारी असेल. आर.पी.आय पक्षाच्या वतीने देखील सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे यांनी पाली नगरपंचायत झालीच पाहिजे याकरीता घेतलेल्या भुमिकेशी सहमत असल्याचे सांगितले. मनसेच्या वतीने संजय घोसाळकर यांनी पाली नगरपंचायत होण्यासाठी सर्वपक्षिय जनता व पालीकरांच्या वतीने घेण्यात येणार्‍या सर्व निर्णय प्रक्रीयेत मनसेचा पुर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या वतीने पाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जवके यांनी सांगितले की पाली नगरपंचायत व्हावी याकरीता सुरवातीपासूनच शिवसेनेचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते सकारात्मक भुमिकेत आहेत. परंतू येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबतचा निर्णय मात्र स्पष्ट केला नाही.

पाली नगरपंचायत व्हावी याकरीता सर्वप्रथम अभिजीत चांदोरकर, आलाप मेहता, अरिफ मनियार, सुशिल शिंदे आदिंसह पालीतील जागरुक तरुणांनी पुढाकार घेवून नगरपंचायतीची चळवळ सुरु केली. यावेळी शे.का.प नेते सुरेश खैरे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, भा.ज.पा सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा, कॉग्रेस पक्षाचे सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, पाली सरपंच जनार्दन जोशी, उपसरपंच सचिन जवके, शिवसेना पाली शहर प्रमुख आप्पा खोडागळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी सुधागड तालुकाध्यक्ष संजय घोसाळकर, ग.रा.म्हात्रे, प्रकाश कारखानिस, आलाप मेहता, अरिफ मनियार. अभिजीत चांदोरकर, विद्देश आचार्य, राजेंद्र गांधी, अनुपम कुलकर्णी,उमेश मढवी, रमेश मुल्ल्या, किशोर दिघे, पराग मेहता, सुधिर साखरले, संजोग शेठ, निखिल खैरे, आदिंसह सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com