कलई व्यवसायाला उतरती कळा

अमित गवळे 
सोमवार, 21 जानेवारी 2019

पाली - कलईचा व्यवसाय कमी झालाय, कलई संपलीच आता. ! कलईच्या किंमती वाढल्या, खेडेगावात लोक राहिली नाहीत, घराघरात नळ आले, कलईच्या भांड्यांचा वापर कमी झाला आणि काही वर्षांपासून धंदा निम्यापेक्षा कमी झाला. पोर हे करणार नायत… आमच्यावर स्टॉप झालाय धंदा. वडिलोपर्जित कलई व हांडे-कळशी दुरुस्ती व्यवसाय करणार्या सुनिल बामणे यांनी हवालदिल होऊन आपली व्यथा सकाळकडे मांडली.

पाली - कलईचा व्यवसाय कमी झालाय, कलई संपलीच आता. ! कलईच्या किंमती वाढल्या, खेडेगावात लोक राहिली नाहीत, घराघरात नळ आले, कलईच्या भांड्यांचा वापर कमी झाला आणि काही वर्षांपासून धंदा निम्यापेक्षा कमी झाला. पोर हे करणार नायत… आमच्यावर स्टॉप झालाय धंदा. वडिलोपर्जित कलई व हांडे-कळशी दुरुस्ती व्यवसाय करणार्या सुनिल बामणे यांनी हवालदिल होऊन आपली व्यथा सकाळकडे मांडली.

साधारण दहा - बारा वर्षांपुर्वी गावागावत हांडे-कळशी व टोपांना कलई लावणारे व त्यांची डागडुगी करणारे कलईवाले मोठ्याने आवाज देत हमखास येत असत. घरातील बायका मग लगबगीने हातात हांडे-कळसी आणि टोप घेवून बाहेर येत. लहान मुलांचा देखिल या कलईवाल्यांच्या आजुबाजूबाजुला गलका असे. मात्र प्लास्टिक भांड्यांचा अधिक वापर, घरांमध्येच पाणी येणे, महागाई, व्यवसाय न परवडणे अशा अनेक कारणांमुळे हा फिरस्तीचा हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुळ सातारा मात्र मागील अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मेढे गावात राहणारे आणि वडिलोपर्जित हा व्यवसाय करणारे सुनिल बामणे यांनी सकाळला सांगितले की तेव्हा चांगला धंदा होता. १०-१५ वर्षांपुर्वी हा व्यवसाय करणारे अनेक जण सर्वत्र फिरायचे. मात्र आता धंदा परवडत नाही. जिल्ह्यातील आडवाटेतील गावागावत फिरतो. सोबत पत्नी पिंकी असते ती बांगड्या विकते. परंतू खेडेगावात लोक राहिली नाहीत सर्व मुंबईला गेलेत त्यामुळे सुद्धा व्यवसाय कमी झाला आहे. घरगूती टोप आणि प्रसादाच्या मोठ्या टोपांना कलई लावतो. पण आता तीसुद्धा कमी झाली आहेत. कलई महाग झाली असल्याने कलई लावायचे भाव वाढले आहेत. मग स्टिलवर आलो आहे. हांडे कळशी दुरुस्ती करतो, त्यांना डाग लावतो. आता गावागावांत आणि घरांत नळ आल्याने हांडे-कळशी जास्त पडत नाहीत त्यामुळे देखिल हा व्यवसाय कमी झाला आहे असे काही गंमतीशीर कारणे सुनील यांनी सांगितली. सुनील हातोडी, छिन्नी, कैची, सळई, छोटा स्टोव्ह, लांबी व रिबीट असे साहित्य घेवून दुचाकीवर फिरतात. सुनील यांना एक मुलगा दोन मुली आहेत. ते शाळा शिकतात. त्यांचे दोन भाऊ हा व्यवसाय करत आहेत. तर एक भाऊ मुंबईला गेला आहे रिक्षा चालवायला. वडिलोपर्जित धंदा आहे म्हणून बामणे तो सांभाळत आहेत. अन्यथा त्यांच्या पुढची पिढ मात्र या धंद्यात उतरणे अशक्य आहे.

दुसरा कुठं काम ना धंदा, जो पर्यंत या धंद्यावर भागतयं तो पर्यंत भागवायचं. पोर हे काम करणार नायत. आमच्यावर स्टॉप झालाय धंदा. काही दिवसांनी आपल्याला वाटल आपल भागत नाय तर आपण बी कल्टी मारायची मुंबईला.
- सुनील बामणे, कलईवाले

Web Title: pali - kalahi business will not last long