विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

पाली - येथील बाजारपेठेजवळ राहणाऱ्या मनस्वी मयूर म्हात्रे (28) या विवाहितेने घराच्या छताच्या हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती, सासू-सासऱ्यांसह चौघांना अटक केली आहे. याबाबत अनंत गणपत शेळके यांनी पाली पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पहिल्या प्रसूतीसाठी सासरकडून खर्च झालेले एक लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी तगादा लावल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती मयूर म्हात्रे याच्यासह सासरे उमाजी म्हात्रे, सासू ज्योती उमाजी म्हात्रे; तसेच शीतल नितीन साळवी आणि द्रौपदी पांडुरंग म्हात्रे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. द्रौपदी म्हात्रे वगळता अन्य चार जणांना अटक करण्यात आली. उपनिरीक्षक एल. व्ही. म्हात्रे तपास करीत आहेत.
Web Title: pali konkan news women suicide