मुस्लीम दफनभूमीतील अतिक्रमण हटविण्यासाठी बेणसेकर यांचे उपोषण 

अमित गवळे
मंगळवार, 27 मार्च 2018

पाली - सुधागड तालुक्यातील पाली येथे गुरांचे दवाखाना शेजारी सर्व्हे नं. 24 मध्ये मुस्लीम समाजाची दफनभूमी आहे. या जागेत अतिक्रमण करुन घर बांधण्यात आले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अब्बास इस्माईल बेणसेकर यांनी केली आहे. येथील अतिक्रमण हटविण्यात यावे याकरीता अब्बास बेणसेकर सोमवारपासून (ता.26) येथील तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. 

सदर अतिक्रमणाबाबत सन 1994 पासून ग्रुप ग्रामपंचायत पाली सरपंच, पाली-सुधागड तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, वनविभाग, जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज व आवश्यक तो पत्रव्यवहार केला असल्याचे बेणसेकर यांनी सांगितले आहे. पाली मुस्लीम समाज दफनभुमीतील जागेत होत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे व जागा पुर्ववत करण्यात यावी या मागणीच्या पुर्ततेसाठी अब्बास बेनसेकर यांनी हे आमरण उपोषण सुरु केले आहे. 

या उपोषणाला रजाद शेख व महम्मद परबळकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. याप्रकरणी समविचाराने व समंजसपणे चर्चा घडून यावी व या प्रकरणावर कायमचा पडदा पडावा अशी अपेक्षा पालीतील सुजान नागरिक करीत आहेत.

Web Title: pali musli muslim crematorium illegal construction