पाली शहरात ग्रामपंचायत की नगरपंचायत? संभ्रम कायम...

अमित गवळे
गुरुवार, 5 जुलै 2018

पाली (रायगड) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाली ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल (मुदत) सोमवारी (ता. 2) सायंकाळी संपला. येथे लवकरच प्रशासकाची नेमणूक देखिल करण्यात येणार आहे. मात्र येथे नगरपंचायत होणार की ग्रामपंचायतीकडे कारभार राहणार याबाबत संभ्रम कायम राहिला आहे.

पाली नगरपंचायत स्थापन व्हावी अशी सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह पालीकर जनतेची देखिल इच्छा आहे. मात्र अाजतागायत शासनाकडून पाली नगरपंचायत व्हावी का ग्रामपंचायतच रहावी या संदर्भातील कोणत्याच सूचना किंवा नोटिफिकेशन अालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वच जण संभ्रमावस्थेत अाहे. 

जर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाली ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अादेश अाले तर नक्की नगरपंचायत स्थापन होणार. अाणि निवडणूका होईपर्यंत पाली-सुधागड तहसिलदार प्रशासक म्हणून काम पाहतील अाणि जर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून अादेश अाल्यास निवडणुका होईपर्यंत विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील. परिणामी पाली नगरपंचायतीचे स्वप्न भंग होऊन ग्रामपंचायतच जैसे थे राहणार. मात्र जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अादेशावर सर्व ठरणार आहे.

अाधी निर्णय कोणाचा?
शासनाची पाली नगरपंचायत होण्यासंबधी नोटीफिकेशन निघण्यास वेळ गेल्यास रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे विस्तार अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे अादेश देतील. शासनाने नगरपंचायतीस मंजुरी दिल्यास जिल्हाधिकारी हे तहसिलदारांची प्रशासक म्हणून नेमणूक करतील.

अजून प्रशासकाची नेमणूक झालेली नाही. तसेच ग्रामपंचायतीला सरपंच नसल्याने नालेसफाई, सांडपाणी, दिवाबत्ती व पाणी पुरवठा असे अनेक प्रश्न उद्भवणार आहेत. तसेच बांधकाम परवाने व इतर दाखले मिळवतांना देखील अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालीकर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासक नेमण्यासमदर्भातील पत्र दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार पुढिल कार्यवाही केली जाईल.
- विनायक म्हात्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाली-सुधागड

पालीकर जनता व सर्व पक्षियांचा नगरपंचायत होण्याच्या मागणीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. त्यावर अजुन कार्यवाही झालेली नाही.

पाली ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्यावर येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील पत्र मंगळवारी (ता.३) पाली-सुधागड पंचायत समिती गटविकास अधिकार्यांकडे पाठविले आहे. ग्रामविकास अधिकारी व सचिव म्हणून काम करणार आहे.
- ए.एस. जमधाडे, ग्रामविकास अधिकारी, पाली
 
Web Title: pali nagarpanchayat or grampanchayat confusion continuous