अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत संकष्टी चतुर्थीला भक्तिमळा फुलला

अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिकस्थळ असलेल्या पाली शहरात संकष्टी चतुर्थीला शनिवारी (ता.12) बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते.
Pali Ganpati
Pali GanpatiSakal
Summary

अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिकस्थळ असलेल्या पाली शहरात संकष्टी चतुर्थीला शनिवारी (ता.12) बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते.

पाली - अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिकस्थळ असलेल्या पाली शहरात संकष्टी चतुर्थीला शनिवारी (ता.12) बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. दुसरा शनिवारची सुट्टी असल्याने दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. भाविक व स्थानिकांच्या वाहनांमुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसर, वडेर हायस्कुल, महाकाली मंदिर चौक, बाजारपेठ, गांधी चौक, हाटाळेश्वर चौक वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलीस व देवस्थान ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडवीत होते.

बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे घेऊन अनेक आदिवासी महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, अरुण गद्रे, विश्वास गद्रे, अमोल साठे आणि डॉ. पिनाकीन कुंटे यांच्या मार्फत भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर लावले आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग, मांडव व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com