संकष्टी चतुर्थीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत गर्दी

अमित गवळे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पाली -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता.24) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते.

पाली -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता.24) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते.

भाविकांच्या गाड्यांमूळे पालीत वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीन चोख व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदिंचा धंदा तेजित होता. 

बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. 
ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली 

भाविकांची क्षुधा शांती…
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साबुदाणा वाड्यांचे वाटप करुन त्यांची क्षूधा शांत केली. मुंबई विदयापीठाच्या अजिवन अध्ययन व विस्तार कार्य विभागातर्फे चालविल्या जाणार्या विविध उपक्रमा अंतर्गत पालीवाला महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी या विभागाचे क्षेत्रीय समन्वयक प्रा. देवीदास शिवपुंजे, विस्तार कार्य शिक्षक यशवंत भांडकोळी व दिलीप निकम, उपप्राचार्य सुधीर पुराणीक, प्रा. मानलिंग लिमण, डॉ. अंकूश सोहनी, प्रा. एस. एस. खैरणार, प्रा. सुरेश पाथरकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य युवराज महाजन यांनी उपक्रमास मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई विदयापीठाच्या अजिवन अध्ययन व विस्तार कार्य विभागातर्फे चालविल्या जाणार्या विविध उपक्रमा अंतर्गत पालीवाला महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठी विवीध प्रकल्पांचे काम केले जाते. या विभागामार्फत स्त्रियांचा समाजातील दर्जा, सर्वेक्षण, करियर प्रकल्पातून जनजागृती व अन्नपुर्णा योजनेतून समाजामध्ये अन्नाविषयी महत्व पटवून दिले जाते. असे विविध उपक्रम व प्रकल्प राबिविले जातात. या विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील व शेठ ज. नौ. पालीवाला महाविदयालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय समन्वयक प्रा. देवीदास शिवपुंजे, विस्तार कार्य शिक्षक यशवंत भांडकोळी व दिलीप निकम उत्तम प्रकारे सर्व प्रकल्प राबवित आहेत.

Web Title: Paliat rush for the celebration of Ballaleshwar