पालीमध्ये अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाचे विवीध स्तूत्य उपक्रम

अमित गवळे 
बुधवार, 27 जून 2018

पाली - पालीतील अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाद्वारे रविवारी (ता.२४) गरजुंना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी डोळ्यांची निगा राखण्या संबधीचे मोफत मार्गदर्शन शिबीर देखिल आयोजित करण्यात आले होते. याआधी अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाच्या वतीने पालीत दहा हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

येथील भक्त निवास क्रमांक १ मध्ये आयोजित डोळ्यांची निगा कशी राखावी या शिबीरचे प्रमुख वक्ते लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. मोहन हिंदूपुर हे होते. त्यांनी सहज सोप्या भाषेत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ते उपस्थितांना समजावून सांगितले. यानंतर गरजवंतांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थानचे विश्वस्त विनय मराठे यांच्या सह अनुपम कुलकर्णी तसेच अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर व सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

आमच्या सर्व उपक्रमांना नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पालीतील प्रदुषण व कचर्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. काही दिवसांनी अनुपमदादा मित्र मंडळातर्फे पालीत प्रत्येक इमारत, आळी व सोसायटीमध्ये ओला व सुका कचरा विभागून ठेवण्यासाठी मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात येणार आहे.
अनुपम कुलकर्णी, पाली
 
Web Title: Pali's Anupam Kulkarni Mitra Mandal's distributes umbrella