दिव्यागांच्या बुद्धिमत्तेला वाव हवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मालवण - सर्वसाधारण मुलांपेक्षांही दिव्यांग असलेल्या मुलांमध्ये असणारी आकलन शक्ती व बुद्धिमत्ता विलक्षण असते. त्यांच्यातील सुप्त गुण व बुद्धमत्तेला वाव देऊन त्यांची उन्नती साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांच्या पालकांनी कणखर बनायला हवे. दिव्यांगासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नेहमीच सहकार्य राहील, असे आश्‍वासन पंचायत समितीच्या सभापती हिमाली अमरे यांनी आज येथे दिले. 

सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या उपक्रमातंर्गत दिव्यांग मुलांमधील न्यूनगंडाची भावना कमी करून त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून येथील पंचायत समितीतर्फे आज तालुका स्कूल येथे अपंग दिव्यांग जागरुकता व समाज जाणीव जागृती सप्ताहांतर्गत दिव्यांग बालआनंद मेळावा झाला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन माजी सभापती पंचायत समिती सदस्य उदय परब यांच्या हस्ते झाले. या वेळी सभापती हिमाली अमरे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, वसंत महाले, केंद्रप्रमुख अन्वर शेख, गौरी नार्वेकर आदी उपस्थित होते. 

श्री. परब म्हणाले, ""दिव्यांग मुलांना सुप्तगुणांची दैवी देणगी लाभलेली असते. त्यांच्या सुप्तगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. दिव्यांगामधील गुण विकसित झाल्यास भविष्यात ते नक्कीच नावारूपास येऊन एक चांगले जीवन जगू शकतील. दिव्यांगांच्या विकासासाठी लागणारा निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू.'' 

या वेळी वसंत महाले, उदय दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. दिव्यांग मुलांमधील कलागुणांना वाव देणारा चित्रकला, रांगोळी, रंगभरण, मैदानी खेळ, गायन, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा आदींचा समावेश असलेला स्पर्धात्मक कार्यक्रम झाला. अनिल खडपकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

Web Title: Panchayat Samiti chairperson Himali amare