esakal | खवल्यांच्या विक्री प्रयत्नात राजकीय पुढार्‍याचाच हात
sakal

बोलून बातमी शोधा

pangolin smuggling in ratnagiri on political leader arrested by police yesterday evening

गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी संशयिताला संबंधित पोलिस ठाण्यात वर्ग केले आहे.    

खवल्यांच्या विक्री प्रयत्नात राजकीय पुढार्‍याचाच हात

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  खवले मांजराची शिकार करून खवल्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लांजा येथील एका राजकीय पुढार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. साटवली येथील हा राजकीय पुढारी आहे. काल सायंकाळी उशिरा ही कारवाई केली. गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी संशयिताला संबंधित पोलिस ठाण्यात वर्ग केले आहे.                         

जितेंद्र सुरेश चव्हाण (रा.लांजा) असे संशयिताचे नाव आहे. खवले मांजराची 10 किलोची खवले घेऊन विक्री करण्यासाठी रुण फाटा येथे येणार होते. तशी खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक रुण फाटा येथे काल सायंकाळी दाखल झाले. पथकाने सापळा रचला. जितेंद्र चव्हाण हा रुण फाटा येथे आल्यानंतर तो कोणत्या ग्राहकाला विक्री करणार आहे, याची देखील वाट पहात बसले होते. मात्र बराच वेळ झाला तरी खवले विकत घेणारा आला नाही. 

हेही वाचा - एकही शिवसैनिक भाजपात जाणार नाही -

जितेंद्र चव्हाण निघून जाईल व रचलेला सापळा फसेल म्हणून गुन्हा अन्वेषण विभागाने जितेंद्र चव्हाण याला धाड टाकून सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता खवल्या मांजराची 10 किलो वजनाची खवले आढळून आली. गुन्हा अन्वेषण विभागाने जागेवर पंचनामा करून रात्री लांजा पोलिस ठाण्यात जितेंद्र चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक माने, पोलिस कॉन्स्टेबल बागणे, डोमणे, झोरे,  बागूल, पी. ऐन. दरेकर, भोसले, पालकर, पोलिस कॉन्स्टेबल दत्ता कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top