दुर्लक्षित लेण्यांबाबत पन्हाळेकाझी ग्रामस्थांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

दापोली - तालुक्‍यातील दुर्लक्षित आणि एकेकाळी शिलाहार राज्याची राजधानीचे ठिकाण असलेल्या पन्हाळेकाझी या पर्यटनस्थळाच्या दुरवस्थेची पाहणी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी दाविक्षे प्रेस फाउंडेशन आणि दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २) केली. या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी सोयी-सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी ग्रामस्थांसमवेत चर्चा करून पाठपुरावा करण्याचे निश्‍चित केले.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या पन्हाळेकाझी गावातील समस्या शासनाच्या समोर आणण्यासाठी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ६ जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. या वेळी दाविक्षे प्रेस फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त नाना मोरे, दापोली पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, ‘सकाळ’चे बातमीदार हर्षल शिरोडकर, अमोल मुंगशे उपस्थित होते.
शिलाहार राज्याची एकेकाळी राजधानी असलेले, पन्हाळेकाझी येथे हिंदू आणि बौद्ध प्रकारची २९ लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्धस्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, रामायण आणि महाभारतातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. याठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात; मात्र याठिकाणी  पर्यटकांना आवश्‍यक प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना गैरसोयीचे ठरते. या ठिकाणी येण्यासाठी दापोलीतून तेरेवायंगणी मार्गे असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विश्रांतीगृह, प्रसाधनगृह यासारख्या प्राथमिक सुविधा या गावात उपलब्ध नसल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना येथे अधिक वेळ थांबणे शक्‍य होत नाही. प्राचीन आणि ऐतिहासिक पन्हाळेकाजी गावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्यासाठी दाविक्षे प्रेस फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

Web Title: panhalekajhi public discussion for Ignore caves