पानिपत रिफायनरी प्रकल्पग्रस्त म्हणतात नाणारचा कायापालट शक्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

राजापूर - पानिपत रिफायनरीमुळे प्रकल्पग्रस्त गावे व परिसराचा कायापालट झाला आहे. अशाच प्रकारचा विकास रत्नागिरी रिफायनरीमुळे होणार आहे. भविष्यातील विकासाचा 
वेध घेऊन रत्नागिरी रिफायनरीला तेथील ग्रामस्थांनी साथ द्यावी, असे आवाहन पानिपत रिफायनरी प्रकल्पग्रस्त गावांमधील आजी-माजी सरपंचांनी केले. 

राजापूर - पानिपत रिफायनरीमुळे प्रकल्पग्रस्त गावे व परिसराचा कायापालट झाला आहे. अशाच प्रकारचा विकास रत्नागिरी रिफायनरीमुळे होणार आहे. भविष्यातील विकासाचा 
वेध घेऊन रत्नागिरी रिफायनरीला तेथील ग्रामस्थांनी साथ द्यावी, असे आवाहन पानिपत रिफायनरी प्रकल्पग्रस्त गावांमधील आजी-माजी सरपंचांनी केले. 

पानिपत रिफायनरीमुळे झालेला विकास, मिळालेला रोजगार आणि जमिनीला मिळालेला योग्य मोबदला लक्षात घेऊन पानिपतमधील ग्रामस्थ रिफायनरीला विरोध करण्याऐवजी तेथील जागा देण्यासाठी स्वेच्छेने पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून तीव्र विरोध केला जात आहे. त्या विरोधाला राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे.

या अनुषंगाने रत्नागिरी पेट्रोकेमिकल कंपनीच्या वतीने पानिपत रिफायनरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या वेळी तेथील प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच रणजितसिंग कश्‍यप, कुथन गावचे सरपंच बलवानसिंग, सिंथानाचे सरपंच सतपालसिंग, दादलानाचे सरपंच दीपक राणा, त्याच गावचे माजी सरपंच नैनपाल राणा, बाहोली गावचे माजी सरपंच सरदार सज्जनसिंग आदींनी नाणार प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला.

पानिपत रिफायनरीसंबंधित लोकांच्या विविध शंका-कुशंकाचे कंपनीच्या अधिकारी, तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधून निरसन करण्यात आले. त्यातून, लोकांना प्रश्‍नांची उत्तरे मिळत गेली. रिफायनरीला वीस वर्षे झाली तरी, प्रदूषणाचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. कधीही ॲसिडयुक्त पाऊस पडला नाही. या भागामध्ये बासमती तांदूळ आणि गव्हाचे उत्तम पीक येते. कोणतीही साथ वा आजारांचा फैलाव नाही.
- बलवानसिंग,
सरपंच, 
कुथन ग्रामपंचायत

खोराखैरीचे सरपंच रणजितसिंग कश्‍यप म्हणाले, इंडीयन ऑईल कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांसह गावांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या मदतीतून गावा-गावांमध्ये शैक्षणिक, सामाजिक विकास झाला. रिफायनरीच्या माध्यमातून झालेल्या शैक्षणिक विकासामुळे शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना विविध पदांवर नोकऱ्या मिळाल्या. अशाच प्रकारचा विकास रत्नागिरी रिफायनरीच्या माध्यमातून होणार असल्याने ग्रामस्थांनी रिफायनरीला साथ द्या.

यावेळी नीलेश पाटणकर यांच्यासह राजापुरातील काही ग्रामस्थाच्या शंकाचे त्यांनी निरसन केले. 

Web Title: Panipat refinery project affected people visit Nanar