चिपळूणातील काँग्रेस मेळाव्यातच "हमारा पप्पू पास हो गया"

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

चिपळूण - त्याचबरोबर विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवतात. मेळाव्यात देखील "हमारा पप्पू पास हो गया" असा उल्लेख कार्यकर्त्यांनी केल्याने सारे अवाक झाले. येथे झालेल्या तालुका काँग्रेस मेळाव्यात हा उल्लेख झाल्याने नेत्यांसह सारे गोरेमोरे झाले. भाजपकडून राहुल यांची उडवली गेलेली खिल्ली आणि सततचा उल्लेख काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही कसा भिनला याचे प्रत्यंतर यामुळे आले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा येथे काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाचे गुणगान गाण्यात धन्यता मानली. पक्षाचा 130 वर्षाचा इतिहास सांगून आम्ही संपणार नसल्याची गर्जनाही केली. जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसची भक्कम स्थिती नाही. जिल्ह्यातील पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काही ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमींनाही याची चांगली माहिती आहे. मेळाव्यात पक्षाला चालना मिळण्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम सुचवले जातील अशी अपेक्षा होती. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी घराणे आणि काँग्रेसचा इतिहास व गुणगान गाण्यात धन्यता मानली.

मोदी सरकारच्या फसलेल्या निर्णयांवर देखील पदाधिकाऱ्यांनी बोट ठेवले. प्रामुख्याने भाजपकडून राहुल गांधी यांना पप्पू म्हणून टीका केली जाते. मात्र चिपळूणात झालेल्या आजच्या मेळाव्यात, एका पदाधिकाऱ्याने राहुल गांधींचे गुणगान गाताना नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत "पप्पू पास हो गया" सांगितले. या वक्‍तव्यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमित झाले. आपल्याच लोकांकडून असा उल्लेख चुकीचा असल्याचे मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासगीत व्यक्त केले.

दुखऱ्या नसेवर बोट

जिल्हाध्यक्ष कदम व तालुकाध्यक्ष यादव यांनी पक्षाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. जुने-पुराणे उगाळत बसण्यापेक्षा सध्याची परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष देण्याचा सूचक इशारा दिला. 

Web Title: Pappu Pass ho gaya in Congress conference