परब प्रतिष्ठानतर्फे पाणी योजना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

वेंगुर्ले - मातोंड येथे (कै.) देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान, मुंबईतर्फे शेतकऱ्यांसाठी पाणी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. प्रतिष्ठानने पाणीमोटार व १३५ पाइप मोफत दिले आहेत.

वेंगुर्ले - मातोंड येथे (कै.) देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान, मुंबईतर्फे शेतकऱ्यांसाठी पाणी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. प्रतिष्ठानने पाणीमोटार व १३५ पाइप मोफत दिले आहेत.

मातोंड गावातील शेतकरी पाण्याअभावी शेतीपासून वंचित होऊ नये, म्हणून प्रतिष्ठानने मातोंड ग्रामस्थ व युवकांच्या माध्यमातून नियोजन करून सुमारे १ किलोमीटर अंतरावरील नदीचे पाणी शेताच्या बांधापर्यंत आणण्याचे ठरवले. यानंतर सर्व शेतकऱ्यांची बैठक झाली. पूर्ण कामाचे आर्थिक नियोजन करून ही योजना गावात राबविल्यास कमीत कमी १०० ते १५० एकर क्षेत्रात असणाऱ्या ५० ते ६० शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

यानंतर या योजनेचा प्रारंभ काल (ता. १) प्रतिष्ठानचे ॲड. प्रकाश परब यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक दादा म्हालटकर-परब यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय परब, सचिव क्षितिज परब, सल्लागार व पंचायत समिती माजी उपसभापती बाळू परब, अमित परब, नितीन परब, नंदकिशोर घाडी, राहुल प्रभू, सुभाष सावंत, दीपेश परब, प्रशांत परब उपस्थित होते. या योजनेद्वारे मातोंड तुळस गावांच्या मध्यभागी असलेल्या नदीतील पाणी १३५ पाइपलाइनद्वारे येथून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरील शेताच्या मध्यभागी आणण्यात येणार आहे.

Web Title: Parab pratisthan by the water plan