esakal | कुणाचा गुलाब ठरला किंग ऑफ द शो ?
sakal

बोलून बातमी शोधा

Parag Panvalkar Rose King Of The Show In Competition Ratnagiri Marathi News

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धासुद्धा आयोजित केली. त्यामध्ये मुलांनी विविध बक्षिसे मिळवली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गुलाबप्रेमी, जांभेकर विद्यालय, लायन्स क्‍लब, रोटरी क्‍लब आदींचे सहकार्य लाभले. 

कुणाचा गुलाब ठरला किंग ऑफ द शो ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - रोझ सोसायटीतर्फे आयोजित गुलाब पुष्पप्रदर्शन व स्पर्धेत किंग ऑफ द शोचा मान पराग पानवलकर आणि क्वीन ऑफ द शोचा मान अझिझा गिनीवाले यांच्या गुलाबाला मिळाला. जांभेकर विद्यालयात हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली. 

अन्य स्पर्धांचा निकाल (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)- फुलांसहित कुंड्या - डॉ. शिवानी पानवलकर, रफिका डिंगणकर, अझिझा गिनीवाले. फुलविरहित कुंड्या- शिल्पा पानवलकर, शुभांगी साखळकर, पराग पानवलकर. हॅंगिंग कुंड्या रफिका डिंगणकर, शर्मिली गांगण, विनय गांगण. पुष्परचना - निमिषा शेट्ये, रफिका डिंगणकर, समिता शेट्ये, रफिका डिंगणकर व रसिका तेरेदेसाई. पुष्परांगोळी- सायली शिंदे, शीतल विचारे. रांगोळीने काढलेली फुले- सृष्टी पेटकर. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धासुद्धा आयोजित केली. त्यामध्ये मुलांनी विविध बक्षिसे मिळवली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गुलाबप्रेमी, जांभेकर विद्यालय, लायन्स क्‍लब, रोटरी क्‍लब आदींचे सहकार्य लाभले. 

स्पर्धेचा निकाल असा - 

किंग ऑफ द शो - पराग पानवलकर (डॉ. मुकुंद पानवलकर स्मृती), क्वीन ऑफ द शो - अझिझा गिनीवाले (डॉ. स्मिता पानवलकर स्मृती), उत्कृष्ट लाल गुलाब- ऋचा पानवलकर, पिवळा गुलाब - शौनक पानवलकर, निळसर गुलाब - विनय गांगण, सफेद गुलाब- अझिझा गिनीवाले, गुलाबी गुलाब - अनिस गिनीवाले, केशरी गुलाब - शर्वरी मुळ्ये, पूर्ण उमललेला गुलाब - मुग्धा जोगळेकर, मिनिएचर गुलाब - अनिस गिनीवाले, रफिका डिंगणकर, शिल्पा पानवलकर. द्विरंगी गुलाब- शिल्पा पानवलकर, मुग्धा जोगळेकर, डॉ. शिवानी पानवलकर, फ्लोरिबंडा गुलाब - पराग पानवलकर, दीप्ती फडके, मुग्धा जोगळेकर. नोव्हाईस (नव्याने भाग घेणारे) - अक्षय गिडिये. 
 

 
 

loading image