वाहनतळाचे कुलूप अखेर काढले - राहुल पंडित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

रत्नागिरी - ‘शहरातील वाहनतळाचा ताणलेला विषय सामंजस्याने सोडविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. हिंदू कॉलनीतील वाहनतळाचे कुलूप पालिकेने काढले आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांची चूक आहे. त्यांनी पालिकेची परवानगी घेण्याची गरज होती; पण अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्यासोबत बैठक झाली. त्यांचा वाहतुकीवर मोठा अभ्यास आहे. वर्षभरात शहराला वाहतूक शिस्त लावण्यासाठी अनेक निर्णय घेतले जातील’, अशी माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली. 

गेले चार दिवस शहरात वाहनतळाचा विषय चर्चेत होता. वाहतूक शाखा शहरामध्ये बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकीधारकांवर कारवाई करते. टोइंग व्हॅनच्या माध्यमातून वाहने हिंदू कॉलनी येथील पालिकेच्या जागेत ठेवली जातात. तेथून दुचाकीमालक टोइंग व्हॅन आणि दंडाची कारवाई असे २०० रुपये भरून वाहन सोडवून नेतात; मात्र एका नगरसेवकाच्या मानापमानावरून या जागेच्या मालकीवरून वादाला तोंड फुटले. त्यामुळे पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी हा विषय ताणून धरला आणि वाहनतळाला कुलूप ठोकले. त्यानंतर वाहतूक पोलिस आणि पालिकेची बैठक झाली. त्यामध्येही या विषयावर चर्चा झाली. तेव्हा वाहतूक पोलिसांनी वाहनतळासाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले. सत्ताधाऱ्यांनीही हा विषय ताणला; परंतु जागा देणे हे पालिकेचे कर्तव्य असल्याची भूमिका पोलिसांनी मांडली. 

याबाबत नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘‘वाहनतळाचा विषय मिटला आहे. अपर पोलिस अधीक्षक श्री. घट्टे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सामंजस्याने वाहनतळाचे कुलूप काढून कारवाईला सुरवात झाली आहे. श्री. घट्टे यांचा वाहतुकीवर मोठा अभ्यास आहे. त्याचा फायदा घेऊन शहरामध्ये वर्षभरात वाहतूक शिस्तीबाबत अनेक निर्णय घेणार आहेत; परंतु वाहतूक शाखेने वाहनतळ वापराबाबत पालिकेची परवानगी घेतलेली नाही, हेदेखील तितकेच खरे आहे.’’

Web Title: parking lock open