कुडाळ-मालवण मतदार संघातून परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी

 कुडाळ-मालवण मतदार संघातून परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी

मालवण - कुडाळ-मालवण मतदार संघातून माजी आमदार आणि मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करणार असून यासाठी मतदार संघात स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, गणेश वाईरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इभ्रामपूरकर, विनायक गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. दाभोलकर म्हणाले, कुडाळ- मालवण मध्ये सत्ताधारी आमदार निष्क्रिय असून त्यांनी मच्छीमारांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. आरोग्याची समस्याही गंभीर आहे. पाचवी, बारशाला जाणे हेच आमदार वैभव नाईक यांचे एकमेव काम असून आमदार व जिल्हाप्रमुख ही दोन्ही पदे घेत केवळ छायाचित्रे काढून ती मातोश्रीवर पोचविण्यासाठी त्यांची धडपड असल्याची टीका त्यांनी केली. 

सी वर्ल्ड सारखा प्रकल्प आवश्यक असताना जनतेला विश्वासात न घेतल्यानेच या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील निष्क्रिय असून सावंतवाडीत वगळता जिल्ह्यात अन्यत्र त्यांनी दुर्लक्षच केले आहे. याउलट उपरकर हे एकमेव अभ्यासु व शासन, प्रशासनाचे ज्ञान असणारे नेते आहेत. या मतदार संघातील समस्या तेच सोडवून सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतात. त्यामुळे या मतदार संघातून उपरकर यांनाच उमेदवारी देण्यात यावी यासाठी मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे श्री. दाभोलकर यांनी सांगितले. 

सावंतवाडी अत्याचार प्रकरणी ९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मनसेच्यावतीने सावंतवाडीत गवळी तिठा ते पोलिस उपविभागीय कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसे नेते शिरीष सावंत, स्नेहल जाधव, परशुराम उपरकर आदी सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com