भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हा - विवेक जोशी

pali
pali

पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत बुधावारी (ता.३१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अायोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते.

२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. जोशी पुढे म्हणाले की भ्रष्टाचार मिटाओ, नया भारत बनाओ हे ब्रिद घेवून भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्यासाठी व प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी जनतेलाच पुढाकार घ्यावा लागेल. प्रगत ज्ञान, विकसीत तंत्रज्ञानाने कामकाजात पारदर्शकता येणारच परंतू याकरीता नागरीकांनी सतर्क राहून न घाबरता सहकार्य करणे अपेक्षित आहेत. लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. कोणी सरकारी अधिकारी अथवा लोकसेवक लाच मागत असेल, तसेच कुणाकडे बेहिशोबी मालमत्ता असेल, अथवा शासन योजनेच्या अधिकार व पदाचा गैरवापर केला जात असेल अशां विरुध्द तक्रार केल्यास कारवाई केली जाईल तसेच तक्रारदार नागरीकाच्या प्रशासन पाठिशी राहिल अशी माहिती पोलिस उपअधिक्षक जोशी यांनी दिली.

यावेळी राजेश मपारा, गोविंद शिंदे, अरिफ मनियार, सुरेश आंग्रे, अब्बास बेणसेकर आदिंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला भ्रष्टाराविरोधात पुढे येण्यासाठी महत्वपुर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिन्यातून किमान एकदा सुधागडमध्ये गस्त घालावी अशी मागणी केली. यावेळी नागरीकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले. या बैठकीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनीही महत्वपुर्ण माहिती दिली. बैठकीस विश्वास गंभीर, बळीराम पाटील, विवेक खंडागळे, तसेच सुधागड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, गोविंद शिंदे, ग.रा.म्हात्रे, प्रकाश कारखानिस, अरिफ मनियार, प्रभा द्रविड, आशा पालांडे, अविनाश पिंपळे, पो.ह. प्रफुल चांदोरकर आदिंसह नागरीक उपस्थीत होते.

इथे करा तक्रार
नागरीकांनी तक्रारीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड सदन पिंपळभाट एस.टी स्टॅन्डजवळ अलिबाग रायगड येथे तसेच पोलिस उपअधिक्षक मो.नं. 9923422997, पोलिस अधिक्षक मो.नं. 7350750850) तसेच कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 02141-222331 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com