रत्नागिरी : खेड रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

खेड - मुंबईकडे परतण्यासाठी खेड स्थानकात गर्दी केलेल्या संतप्त प्रवाशांनी तोडफोड केली. दुपारपासून प्लॅटफॉर्मवर हजारो प्रवासी थांबले होते. आधी मांडवी एक्सप्रेस स्थानकावर थांबवली नाही आणि नंतर मागून येणारी रत्नागिरी - एलटीटी हॉलिडे एक्सप्रेसही प्रवाशांनी आधीच खच्चून भरलेली होती. गाडीची दारं आतल्या प्रवाशांनी बंद करून ठेवली होती. परिणामी प्रवाशांचा राग अनावर झाला आणि त्यांनी गाडीच्या काचा फोडायाला सुरुवात केली तसेच रुळावर दगड ठेवले.

खेड - मुंबईकडे परतण्यासाठी खेड स्थानकात गर्दी केलेल्या संतप्त प्रवाशांनी आज गोंधळ घातला. दुपारपासून प्लॅटफॉर्मवर हजारो प्रवासी थांबले होते. आधी मांडवी एक्सप्रेस स्थानकावर थांबवली नाही आणि नंतर मागून येणारी रत्नागिरी - एलटीटी हॉलिडे एक्सप्रेसही प्रवाशांनी आधीच खच्चून भरलेली होती. गाडीची दारं आतल्या प्रवाशांनी बंद करून ठेवली होती. परिणामी प्रवाशांचा राग अनावर झाला त्यांना स्थानकात गोंधळ घातला.

गौरी विसर्जनानंतर आज मुंबईकडे परतण्यासाठी प्रवासी मोठ्या संख्येने खेड स्थानकात उभे होते. दुपारी मडगावहून मुंबईला येणारी मांडवी एक्सप्रेस प्रवाशांनी खचाखच भरली असल्याने थांबा असूनही खेड स्थानकात न थांबताच पुढे रवाना झाली. ज्यांचं या गाडीचं आरक्षण होतं त्या प्रवाशांना धावत्या गाडीकडे बघत राहावे लागले. हतबल झालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता.
कोकणातून मुंबईच्या दिशेने येणार्‍या गाड्या आधीच एक ते दीड तास उशिरा धावत होत्या. त्यामुळे गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणार्‍या प्रवाशांनी खेड स्थानकात खच्चून गर्दी केली होती. मांडवी एक्स्प्रेस 3 वाजून 56 मिनिटांनी खेड स्थानकात थांबते. मात्र आज आधीच उशिरा धावत असलेल्या मांडवीला चक्क खेड स्थानकात थांबाच दिला नाही. परिणामी संतप्त प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. अखेर अर्धा-पाऊण तास हा प्रकार झाल्यानंतर मागून हॉलिडे एक्सप्रेस येत असल्याची उद्घोषणा झाली. त्यात अतिरिक्त डबे असल्याची उद्घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाने केली आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पण हॉलिडे एक्सप्रेसही भरून आली परिणामी प्रवाशांनी पुन्हा मोठा गोंधळ घातला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passages agitation in Khed station