वाहने पकडण्यासाठी प्रवाशांची कसरत

सुनील पाटकर
गुरुवार, 10 मे 2018

मुंवई गोवा महामार्गाच्या लगतच स्थानक असल्याने येथुन वाहन पकडण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रवासी उभे राहत आहेत. वाहन पकडण्यासाठी महामार्ग ओलांडताना प्रवासी व वाहनचालकांना देखील धोका निर्माण झाला आहे. 
 

महाड -  जवळ असलेल्या कोकण रेल्वेच्या वीर स्थानकाबाहेर सध्या कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. वाहनांची कमतरता आणि उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने येथे प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरु आहे. 

मुंवई गोवा महामार्गाच्या लगतच स्थानक असल्याने येथुन वाहन पकडण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रवासी उभे राहत आहेत. वाहन पकडण्यासाठी महामार्ग ओलांडताना प्रवासी व वाहनचालकांना देखील धोका निर्माण झाला आहे. 

कोकणात सुट्टीसाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. कोकणरेल्वेने येणाऱ्या लोकांची कोकण रेल्वेस्थानकांत गर्दी दिसू लागली आहे. 

महाड जवळ असलेल्या वीर रेल्वेस्थानकात देखील अशीच गर्दी असून याठिकाणी गोरेगाव, मंडणगड व महाड पर्यंतचे प्रवासी उतरत आहेत. मात्र या प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी जाण्याकरिता पुन्हा महाड किंवा गोरेगाव खाजगी वाहने किंवा एस.टी. ने जावे लागते. वीर वरून महाडकडे येण्यासाठी विक्रम रिक्षा किंवा एस.टी. बसेस उपलब्ध आहेत. मात्र सध्या गर्दी आणि लग्नसराई असल्याने वाहने उपलब्ध होत नाहीत.

महामार्गाच्या सुरक्षेबाबत याठिकाणी यापूर्वीच उपाययोजना केली आहे. मात्र महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयाला अद्याप कोकण रेल्वेचे पत्र प्राप्त झालेले नाही मात्र पत्र आल्यास किंवा धोकादायक स्थिती लक्षात घेऊन उपाययोजना केली जाईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अमोव महाडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: passengers facing problems in mahad