पाताळगंगा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु

लक्ष्मण डूबे
शनिवार, 19 मे 2018

रसायनी (रायगड) पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणा-या पराडे ते श्री सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावरील पाताळगंगा नदीवरील पुलाचे दुरुस्तीचे काम गुरुवार ( ता 17 ) रोजी पासुन करण्यात आले आहे. तर पुलावरून एकेरी वाहतुक करण्यात आली. दरम्यान पुलाचे काम सुरू करण्यापुर्वी एमआयडीसीने कारखानदारांच्या पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशनच्या पदाधिका-यांना पुर्व सुचना दिल्या नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

एमआयडीसीच्या या पुलावरून पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच क्षेत्रा बाहेरील कारखान्यांतील तसेच वडगाव, इसांबे, माजगाव, जांभिवली, कराडे खुर्द आणि चावणे आदि ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांतील वाहनांची नेहमी वर्दळ असते. 

दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे कंटेनर, टँकर, ट्रेलर आदि प्रकारच्या अवजड वाहनांना पुलावरून जाण्यास चोवीस तास बंदी घालण्यात आली आहे. काम पुर्ण होई पर्यंत ही बंद आसणार आहे. पनवेल हुन अवजड वाहनांची वाहतुक चौक आणि सावरोली मार्गे वळविण्यात आल्याचे रसायनी पोलिस ठाण्यातुन सांगण्यात आले आहे. 

काम सुरू करणयापुर्वी कारखानदारांनाची बैठक घेतली नाही किंवा कळविण्यात आले नाही. असे बाँम्बे डाईन्ग लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर शेंडे यांनी सांगितले. तर जड वाहन चालकांना सूचना न मिळाल्याने ते वाहन घेऊन या मार्ग वरून येताना दिसतात. पंधरा दिवस पुलाचे काम सुरू राहाणार आहे. मात्र त्यापुर्वी पुर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहे असे एमआयडीसीचे अभियंता जाधव यांनी सांगितले. 

Web Title: Patalganga river bridge repair work started