साकेडीत गांडूळखत प्रकल्पातून समृद्धीचा मार्ग

अजय सावंत
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कुडाळ - शेतीसाठी सेंद्रिय गांडूळखत हाच पर्याय आहे. मुंबईमध्ये वास्तव; पण शेतीक्षेत्रांत प्रचंड आवड जोपासून साकेडी (ता.कणकवली) येथील रवींद्र दिगबर वालावलकर यांनी आपल्या जागेत गांडूळखत प्रकल्प साकारला आहे. ७२ वर्षीय वालावलकर यांचे या क्षेत्रातील पाऊल तरुणपिढीला प्रेरणा देणारे आहे.

कुडाळ - शेतीसाठी सेंद्रिय गांडूळखत हाच पर्याय आहे. मुंबईमध्ये वास्तव; पण शेतीक्षेत्रांत प्रचंड आवड जोपासून साकेडी (ता.कणकवली) येथील रवींद्र दिगबर वालावलकर यांनी आपल्या जागेत गांडूळखत प्रकल्प साकारला आहे. ७२ वर्षीय वालावलकर यांचे या क्षेत्रातील पाऊल तरुणपिढीला प्रेरणा देणारे आहे.

वालावलकर यांनी प्राकृत कृषी हे नाव ब्रॅंडिंग करण्यास ठरवले आणि वडिलोपार्जित जमिनीवर गांडूळखत प्रकल्प उभारला. सध्या १२ बाय ४ मापाचे १० वर्मीबेड्‌स उभारले आहेत. पुढील १० बेड्‌स उभारण्याचे नियोजन सुरू आहे. ज्यातून साधरणतः १५ ते १८ टन खत मिळण्याचा अंदाज आहे. गरीब शेतकऱ्यांसाठीही त्यांनी मोफत गांडूळखत दिले आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी त्यांना त्यांचे थोरले बंधू मधुकर व विजय तसेच वेळोवेळी त्यांचा भाचा मंगेश सामंत, मुलगा अनिकेत याचेही सहकार्य मिळत आहे. त्यांचे काका माधव वालावलकर ८५ वयातही त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

कचऱ्याचे व सुकलेल्या पतेरा जाळून नैसर्गिक प्रदूषण न करता त्याचे वर्गीकरण करून गांडूळखतामध्ये रूपांतर होऊ शकतो हे त्यांनी दर्शविले आहे. हा प्रकल्प गावास दिशादर्शक ठरू पाहत आहे. गांडूळखत साधारणपणे २ ते ३ महिन्यात तयार होत असून, इतर शेती पिकांच्या तुलनात्मक कमीत कमी खर्चात सुरु केला जाऊ शकतो. गांडूळखत प्रकल्पामुळे गावातील ग्रामस्थांना रोजगाराची संधी ही मिळाली आहे.

अल्प शेतकऱ्यांना बाजारातील गांडूळखत विकत घेऊन गाडी भाड्यासकट परवडत नसल्याकारणाने रासायनिक खते वापरुन जमीन नापीक करण्यापासून रोखू शकतो, ही त्यांच्या मनी संकल्पना आहे.

गांडूळखत खत प्रकल्प उभारणीसाठी प्रशिक्षण व बाजार माहितीसाठी ते स्वतः मार्गदर्शन देण्यासाठी कार्यरत आहेत. तरुणांनी अशा व्यवसायकडे वाटचाल करावी, असे वालावलकर यांनी सांगितले.

Web Title: path of prosperity from the Vermi compost Project