विद्यार्थिनीवर अत्याचार: दोघांना 13 पर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

चिपळूण : तालुक्‍यातील धामेली येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस भाग पाडलेल्या दोघा संशयितांना आज खेड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील दोन्ही संशयितांना मंगळवारपर्यंत (ता. 13) पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मृत शाळकरी मुलीचा व्हिसेरा पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अत्याचार प्रकरणी संशयित रूपेश अंकुश कदम (वय 19, कालुस्ते-मावळतवाडी) व आदिनाथ शंकर खेडेकर (19, रा. खांदाट-गवळवाडी) यांना अटक केली होती. 

आत्महत्या करण्यापूर्वी शाळकरी मुलीने दोन तरुणांनी बलात्कार केल्याचे चिठीत लिहिले होते. या व्यतिरिक्त आणखी कोणाचा समावेश आहे का याचाही पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: pc till 13 december to rapists