नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे बहरले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

रायगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी व निसर्ग सौंदर्याचे वरदान असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. नाताळची सुट्टी आणि नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना मोठ्या संख्येने पसंती देत आहेत.

रायगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी व निसर्ग सौंदर्याचे वरदान असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. नाताळची सुट्टी आणि नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना मोठ्या संख्येने पसंती देत आहेत.

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतसाठी पर्यटकांची रायगड मधील समुद्र किनाऱ्यावर लगबग पाहायला मिळत आहे.  संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येथे मोठ्या संख्येने आले असून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर समुद्र किनारे पर्यटकांनी फुल झाले आहेत. येथील लहान मोठी हॉटेल्स हाउसफुल झाली आहेत. वातावरणातील अल्हाददायक गुलाबी थंडी, निसर्ग सौंदर्य व नाताळ आणि वर्षाअखेर असा सुट्टीचा आठवडा असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रायगड किनारपट्टीवर आणि किल्ले रायगडवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. नगरपालिकेने पर्यटकांसाठी, समुद्र किनारा सुशोभीकरण, प्रसाधन गृहे व जीवरक्षक दलांची व्यवस्था केली आहे .

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, किहीम, मांडवा, रेवदंडा या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी झाली पाहायला मिळत आहे. तर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन सुव्यवस्थित केले आहे. 

Web Title: people choose beaches for new year celebration