people Movement kudal konkan sindhudurg
people Movement kudal konkan sindhudurg

कुडाळात अतिक्रमणाविरोधात उपोषण 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - वारंवार पाठपुरावा करून सुध्दा येथील एका डेव्हलपर्सने केळबाईवाडीतील राऊळ घरालगत असलेल्या ओहोळामध्ये कोणतेही बांधकामांची परवानगी न घेता अतिक्रमण केल्याने नगरसेवक गणेश भोगटे यांचे नगरपंचायतीसमोर ग्रामस्थांसमवेत उपोषण सुरू केले. 

केळबाईवाडीलगत राऊळ घराशेजारी असलेल्या ओहोळामध्ये एका डेव्हलपर्सने अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केले आहे. यामुळे ओहोळ अरूंद झाल्यामुळे दरवर्षी लगतच्या घरांना पुराचा धोका संभवतो व अती नुकसान होते. ते काढण्यासाठी गेली 1 वर्षे मागणी करून सुध्दा कुडाळ नगरपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत आहे. 
या गंभीर प्रश्‍नांकडे 50 ते 60 रहीवाशांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेऊनही तसेच त्यांनी 5 फेब्रुवारीपर्यत अतिक्रमण काढण्याचे आदेश देवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर आज सकाळपासून नगरसेवक व ग्रामस्थांनी प्रशासन व सत्ताधारी यांच्या विरोधात उपोषण सुरू केले. जिल्हाधिकारी यांनाही उपोषणाबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. 

स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्यासह नागरिक राजन राऊळ, नारायण राऊळ, महेश राऊळ, अनिल नाईक, हेमंत कोंडसकर, संदेश सावंत, समीर पाटकर, प्रसाद वाडयेकर, स्वप्निल सावंत, बाळकृष्ण राऊळ, नितीन पाटकर, अनिकेत राऊळ आदींनी नगरपंचायतीसमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com