हर्णेमधील उत्तरप्रदेशवासीयांनी महाराष्ट्र्र शासनाचे, ग्रामस्थांचे आणि नौकामालकांचे मानले आभार ; 300 कामगार रवाना..

he people of Uttar Pradesh thanked the Government of Maharashtra, the villagers, the boat owners ...
he people of Uttar Pradesh thanked the Government of Maharashtra, the villagers, the boat owners ...

हर्णे (रत्नागिरी) : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या हर्णेमधील उत्तरप्रदेश येथील परप्रांतीय ३०० मजुरांना काल  त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. यावेळी या मजुरांच्या चेहऱ्यावर गावी जाण्याचा वेगळाच आनंद दिसून येत होता.


     दरम्यान, गेले कित्येक वर्षे उत्तरप्रदेश, बिहार, येथील हे मजूर या ठिकाणी मासेमारी उद्योग महत्वाचा असल्यामुळे नौकांवर खलाशी म्हणून किंवा मच्छीसेंटरना कामगार म्हणून किंवा या ठिकाणी बंदरामध्ये अनेक वेगवेगळे उद्योगधंदे करण्यासाठी म्हणून दरवर्षी हा मजुरवर्ग हर्णे मध्ये येत असतो. दरवर्षी मासेमारी हंगाम ३१मे रोजी संपला की हे मजूर जूनमध्ये घरी जातातच आणि पुनः जुलै ऑगस्टच्या दरम्यान या मासेमारी उद्योगासाठी हजर होतात. यावर्षी मात्र तस बघू गेलं तर मासळी हंगाम सुरुवातीपासूनच दुष्काळातच होता म्हणूनच बहुतांशी नौकामालकांनी मासेमारी उद्योग परवडत नसल्याने फेब्रुवारीमध्येच नौका किनाऱ्यावर घेऊन बंद केला होता.

त्यानंतर मात्र कोरोना या साथीच्या रोगाचं संकट या व्यवसायावर उभं राहिलं त्यामुळे सर्व उद्योग बंदच ठेवण्यात आले होते. याचा मोठा फटका नौकामालकांना आणि मजुरांना देखील बसला. कामच बंद झालं होतं. त्यातच सर्व नौकामालकांनी आपापल्या कामगारांना या कालावधीत सर्व खाण्यापिण्याच्या खर्चासहित सांभाळलं होत. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता या मजुरांना घरी जायची प्रचंड ओढ लागली होती त्यामुळे नौकामालकांनी व प्रशासनाने या मजुरांचे शासकीय सोपस्कार पूर्ण करून शासनाकडून मोफत त्यांची चिपळूण पर्यंत महामंडळा च्या एस.टी.ने व चिपळूण मधून ट्रेनने थेट त्यांच्या उत्तरप्रदेशमधील गावापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. या सुविधेअंतर्गत हर्णे मधून एकूण ३०४ परप्रांतीय मजूर १४ एस.टी च्या गाड्यांमधून रवाना झाले.


 यावेळी दापोली पंचायत समितीचे सभापती, हर्णे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, कर्मचारीवर्ग, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, हर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग कर्मचारी, पोलीस खात्याचे कर्मचारी, हर्णे व पाजपंढरीतील मच्छिमार सोसायट्यांचे पदाधिकारी, हर्णे पाजपंढरी परिसरातील नौकामालक आदी ग्रामस्थांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले असे हर्णे तलाठी - श्री.अमित शिगवण यांनी सांगितले. 


जाताना या परप्रांतीय मजुरांनी इतके वर्षात आम्ही स्वखर्चाने जात होतो परंतु यावर्षी मात्र कोविड19 मुळे का होईन पण आम्हाला गावाला मोफत शासनाच्या सहकार्याने जायला मिळत आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्र्र शासनाचे अधिकारीवर्ग, आमचे नौकामालक व येथील ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत ; असे एका उत्तरप्रदेशवासीय मजुराने उदगार काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com