पर्ससिन नौका सीलचा प्रयत्न उधळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

रत्नागिरी - मासेमारी बंदी आदेशाच्या कडक अंमलबजावणीसाठी पर्ससिन नौका मिरकरवाडा बंदरातच सील करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मत्स्य खात्याकडून मंगळवारी दुपारी त्याची अंमलबजावणी सुरू झाली; परंतु पर्ससिनधारकांनी त्याला कडवा विरोध केला. जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश दाखवा, व्हीटीएस यंत्रणेसह सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून समुद्रात 12 वावाबाहेर आम्ही मासेमारी करतो. त्यामुळे सील करण्याचा संबंधच येत नाही, अशी बाजू मच्छीमारांच्या वकिलांनी मांडली. ती मान्य करण्यावाचून पर्याय उरला नाही. अखेर पर्ससिनधारकांकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची लेखी हमी घेऊन मत्स्य खात्याने तात्पुरता तोडगा काढला. मच्छीमारांनी दिलेली हमीपत्रे जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवल्यानंतर यावर पुढील निर्णय होईल.
Web Title: perssin boat seal plan fail