मुख्यमंत्र्यांचा शेखर निकम यांना फोन ;  केली ही सूचना

Phone to Chief Minister Shekhar Nikam Kellys suggestion kokan marathi news
Phone to Chief Minister Shekhar Nikam Kellys suggestion kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना फोन करून स्वतःची आणि मतदारसंघातील लोकांची काळजी घेण्याची सूचना केली मातोश्रीवरून निकम यांचे निवासस्थान असलेल्या राधा गोविंद येथे थेट मुख्यमंत्र्यांचा आलेला फोन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यात कोरोनाची साथ पसरल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे प्रशासकीय पातळीवर शक्य आणि आवश्यक त्या सर्व उपायोजना मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत त्याच बरोबर महाविकास आघाडीतील आमदारांना प्रत्यक्ष फोन करून मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

 रात्री आला मातोश्रीवरून कॉल

आमदार निकम रविवारी दिवसभर प्रशासकीय कामाचा आढावा घेत होते रात्री नऊ वाजता ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या मोबाईलवर मातोश्रीवरून कॉल आला थेट मातोश्रीवरून आणि रात्री आलेला कॉल पाहून निकम यांना धक्काच बसला निकम यांनी कॉल घेतला समोरून मुख्यमंत्र्यांनी मी उद्धव ठाकरे बोलतोय असे सांगत निकम यांच्याकडून चिपळूण संगमेश्वर आणि देवरुख मधील परिस्थितीचा आढावा घेतला कोरोनाची साथ पसरलेली असताना निकम शक्य ते प्रयत्न करून मतदार कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपायोजना करत आहेत त्याबद्दल ठाकरे यांनी निकम यांचे कौतुक केले. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या अशी सूचनाही केली.

मुख्यमंत्र्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
निकम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना मुंबई आणि पुण्यात अडकलेल्या चाकरमान्यांना परत गावी येण्यासाठी दोन दिवसाची संधी द्या अशी मागणी केली तसेच जे लोक मुंबई पुण्यामध्ये राहणार आहेत त्यांचे प्रश्न त्याच ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला जिल्हाबंदी असल्यामुळे चाकरमान्यांचे प्रश्न ते राहत असलेल्या ठिकाणी सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी निकम यांना दिले.

चाकरमान्यांच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा निघेल​

चिपळून संगमेश्वर आणि देवरुख मध्ये प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे पोलीस आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत मुख्यमंत्र्यांनी फोन करून या सर्व कामाची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे चाकरमान्यांच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा निघेल अशी आशा आहे
शेखर निकम आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com